budget collapses  sakal
नाशिक

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! साबण -पावडरच्या किमती ३० टक्क्यांनी महाग

जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सामन्यांचे कंबरडे मोडले

नीलेश छाजेड

एकलहरे : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona)सर्वसामान्यांचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने कंबरडे मोडले होते. यात काही दिलासा मिळतो नाही तोच आता साबण, पावडर व इतर दैनंदिन वापरात लागणाऱ्या वस्तूंचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याने गृहिणींचे बजेट (budget) कोलमडले आहे. २०२१ च्या वर्षभराच्या काळात तेल तूप व डाळींची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली होती. या दरवाढीची जुळवाजुळव करत असताना काही महिन्यांपासून अंगाचा साबण, कपड्याचा साबण, शॅम्पो, डिटर्जंट पावडर, भांड्यांचे साबण आदी वस्तूंच्या दरात मोठी दरवाढ सातत्याने सुरू आहे.

वजन कमी

ज्या कपड्याच्या साबणाची किंमत ५-१० रुपये होती त्यांची किंमत न वाढवता साबणाचे वजन कमी करण्यात आले आहे. डेटॉल या कोरोनाकाळात सर्वाधिक खप असणाऱ्या पाच साबणाचा पॅकची किंमत १९९-२२६ असा प्रवास २६० रुपयांवर पोचला आहे.

तेल, डाळी- साळी यांची महागाई कमी होती की काय त्यात भर अजून साबण -पावडर यांच्या किमतीत २५-३० टक्के दरवाढ झाली. यामुळे आम्हा सर्वसामान्यांचे गणित बिघडत आहे.

- रेणुका रेवगडे, गृहिणी

कच्च्या मालाच्या दरात व क्रूड ऑइलच्या दरात मोठी वाढ झाल्याने साबण व तत्सम वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे.

- सर्वेश बडगुजर, साबण वितरक

वस्तू २०२१ - २०२२

(दर रुपयांमध्ये लाइफबॉय (४ पॅक) ९९ १२४

  • लक्स (५ पॅक) १०४ १५०

  • संतूर (५ पॅक) १३५ १९०

  • डव (३चा पॅक) १०१ १२९

  • गोदरेज नं. १ ७६ १००

  • व्हीम बार २० २५

  • सर्फ एक्सेल २५ ३२

  • व्हील पावडर (१ किलो) ५० ६२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

राजकीय हाराकिरी

भाऊबीजेच्या दिवशी दुर्दैवी घटना! मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका; बहिणीनं भावाचं औक्षण करत दिला निरोप

Prakash Mahajan: मुंडे कुटुंबाचा वारस जाहीर करण्याचा अधिकार भुजबळांना नाही : प्रकाश महाजन

Stock Market Opening: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT