Nashik Bazar Samiti sakal
नाशिक

नाशिक बाजार समितीविरुद्ध ‘ईडी’कडे तक्रार

दिनकर पाटील, सुनील केदार यांचा तक्रार अर्ज

योगेश मोरे

नाशिक : नाशिक बाजार समितीमध्ये (Nashik Bazar Samiti) करोडो रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption)व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत यासंदर्भात नगरसेवक दिनकर पाटील आणि भाजपचे शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी थेट ‘ईडी’ (ED)कार्यालयास तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रार अर्जात म्हटले आहे की, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील २० वर्षांपासून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाला आहे.

एका वर्षाच्या सरकारी लेखा परिक्षण अहवालात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, अफरातफरी, घोटाळा झाला असून, जर एका वर्षात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तर २० वर्षांत हा आकडा निश्चितच हजारो कोटींच्या घरात जाईल, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही बाब गंभीरपणे घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी व ज्यांच्यामुळे शासनाचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्रासोबत महाराष्ट्र शासनाचा सरकारी लेखा परिक्षण अहवालही जोडण्यात आल्याचे म्हटले आहे. अर्जावर दिनकर पाटील आणि सुनील केदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था निवडणुकीत दिनकर पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. हा पराभव त्यांना पचत असल्याने ते सैरभैर झाल्याचे दिसून येते. तसेच दोनच दिवसांपूर्वी तज्ज्ञ संचालकपदाचीही निवड करण्यात आली. त्या वेळी दिनकर पाटील यांनी माझ्यासह सभापती व अन्य संचालकांना शिवीगाळ केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. तसेच संचालक मंडळाने शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांचे संचालकपद देखील रद्दबाबत ठराव केला आहे. त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत. प्रत्येक ठिकाणी दादागिरी चालत नाही, हेही त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.

- देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT