Saptashrungi Devi Idol after conservation & District and Sessions Judge Vardhan Prataprao Desai esakal
नाशिक

भगवती मूर्ती संवर्धन कामाची 8 वर्षांनी परिपूर्ती; निघाला 1800 किलो शेंदूर

महेंद्र महाजन

नाशिक : श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती अष्टादशभुजा महिषासुर मर्दिनी भगवतीच्या मूर्तीच्या संवर्धन कामाचा २०१४ पासून पाठपुरावा सुरू होता. अखेर आताच्या श्री सप्तशृंग निवासिनीदेवी विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन प्रतापराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाच्या कामाला सुरवात होऊन परिपूर्ती झाली. मूर्तीवरील लेपन काढण्यात आले. त्यातून अठराशे किलो शेंदूर निघाला असून, त्याच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला. (Completion of saptashrungi idol conservation work after 8 years Nashik Latest Marathi News)

भगवती मूर्ती संवर्धनाच्या कामाची माहिती विश्‍वस्त ॲड. ललित निकम यांनी दिली. ते म्हणाले, की विश्‍वस्त मंडळाने स्थानिक पुरोहितांच्या विनंतीनुसार नाशिकच्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मूर्ती परीक्षणासंबंधीचे पत्र भारतीय पुरातत्त्व विभागाला पाठविले होते. त्यानुसार विभागाच्या चीफ केमिस्ट डॉ. मॅनेजर सिंह यांच्यासह राज्यस्तरीय समितीने भौतिक आणि रासायनिक परीक्षण करून ऑगस्ट २०१४ मध्ये अहवाल दिला.

त्यानंतर मागील विश्‍वस्त मंडळातील विश्‍वस्त ॲड. अविनाश भिडे, ॲड. जयंत जायभावे, डॉ. रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, उन्मेष गायधनी आदींनी पुरातत्त्व विभागाकडे पत्रव्यवहार केला. त्याप्रमाणे राष्ट्रीय नंबिराजन समितीने निरीक्षण केले. समितीचा अहवाल तत्कालीन विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांच्या कार्यकाळात डिसेंबर २०२० मध्ये मिळाला.

कोरोनानंतर पुरोहित संघाच्या मूर्ती संवर्धनाच्या लेखी पत्रानुसार विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष न्यायाधीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जून २०२१ पासून मूर्ती संवर्धनाच्या कामाला चालना मिळाली. आताच्या विश्‍वस्त मंडळातील कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे, ॲड. दीपक पाटोदकर, मन्जोत युवराज पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांचा मूर्ती संवर्धन कामात सहभाग राहिला.

खडक गळती थांबविण्यासाठी सर्वेक्षण

पवईच्या आय. आय. टी. तर्फे खडकामधील गळती थांबविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यातील ३२३ किलो चांदी काढण्यात आली. त्यानंतर पुन्हा आयआयटीच्या तज्ज्ञांनी पाहणी केली आणि मग फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये ‘ग्राउटिंग' करण्यात आले. त्यातून खडकातील गळती थांबली.

दरम्यानच्या काळात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पॅनलवरील नाशिकमधील अजिंक्यतारा कन्सल्टंट्स यांच्या माध्यमातून मूर्ती संवर्धनाचा अभ्यास सुरू झाला. ही संस्था स्थानिक असल्याने मोठी मदत झाली. या संस्थेतर्फे मूर्ती संवर्धनाचा सविस्तर अहवाल प्राप्त झाला. पुरातत्त्व विभागाच्या अहवालानुसार संवर्धनाची गरज असल्याचे सविस्तर प्रकल्प अहवालातून स्पष्ट झाले. त्यानुसार धर्मादाय सहआयुक्त, जिल्हाधिकारी आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना कामकाजाची माहिती देण्यात आली.

मूर्ती संवर्धनाचे काम सुरू होण्यापूर्वी कळविण्यात आले. त्यानंतर मूर्ती संवर्धनाच्या कामाला अजिंक्यतारा कन्सल्टंटसतर्फे डॉ. सिंह, वास्तुविशारद स्मिता कासार, अभियंता योगेश कासार यांनी सुरवात केली. अभियंता, वास्तुविशारद, संवर्धक, मूर्तिकार, कारागीर, सहाय्यक असे चौदा जण मूर्ती संवर्धनाचे काम पाहत होते.

कामाच्या अनुषंगाने सुरवातीपासून अखेरपर्यंत वेळोवेळी स्थानिक ग्रामस्थांच्या बैठकी घेण्यात आल्या आहेत. संपूर्ण कामाला ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे विश्‍वस्त मंडळ आणि गावातील समन्वयासाठी सरपंच, विश्‍वस्त, ग्रामस्थ, पुरोहितांचा सहभाग असलेली समिती तयार करण्यात आली होती, असेही ॲड. निकम यांनी सांगितले.

"भगवतीच्या मूळ मूर्तीला हानी पोचू नये म्हणून नित्य पूजनासाठी चांदीची उत्सव मूर्ती केली जाणार आहे. त्यासाठी भाविकाने चांदी दिली आहे. चांदीच्या उत्सव मूर्तीसाठी मूळ मूर्तीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तसेच भगवतीच्या मूर्तीशेजारील चांदीची गणेशमूर्ती भाविकाने अर्पण केली आहे." - ॲड. ललित निकम (विश्‍वस्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT