ramdan eid  esakal
नाशिक

Ramzan Festival : रमजान पर्वाच्या दुसऱ्या खंडाचा समारोप

सकाळ वृत्तसेवा

Ramzan Festival : रमजान पर्व तीन खंडात साजरा होत असतो. त्यातील पहिल्या खंडाची रविवारी (ता.२), तर दुसऱ्या खंडाचा बुधवारी (ता.१२) समारोप झाला. तिसऱ्या खंडास गुरुवार (ता.१३) पासून प्रारंभ होणार आहे. मुस्लिम बांधवांना ईदचे वेध लागले आहे. (conclusion of second phase of Ramzan festival nashik news)

रमजान पर्व रहेमत, मगफिरत, जाहन्नूमसे आजादी अशा तीन खंडात विभागला आहे. प्रत्येकी १० उपवासाचा एक खंड असतो. बुधवारी पर्वातील २० रोजे पूर्ण होऊन दुसऱ्या खंडाचा समारोप झाला. गुरुवारपासून जाहन्नूमसे आजादी आशा तिसऱ्या आणि अंतिम खंडास प्रारंभ होणार आहे.

या खंडात बहुतांशी वेळेस केवळ ९ रोजे पूर्ण होऊन दहाव्या रोजाच्या दिवशी रमजान ईद येते. क्वचित काही वेळेस शेवटच्या खंडातील दहा रोजे पूर्ण होत असतात. चंद्रदर्शनावर अवलंबून असते. शिवाय काही जण अंतिम टप्प्यात एत्तेकाफमध्ये बसत असतात.

अर्थात एत्तेकाफमध्ये बसणारी व्यक्ती ईदचे चंद्रदर्शन होत नाही, तोपर्यंत मशिदीमध्येच वास्तव्यास असते. दिवस रात्र त्या ठिकाणी इबादत करत असतात. चंद्रदर्शन घडताच एत्तेकाफमधून बाहेर पडत घरी जात असतात.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

खंडाच्या ९ किंवा १० रोजे पूर्ण होऊन रमजान ईद साजरी होते. शेवटच्या दिवसांमध्ये इबादत करण्यासह मुस्लिम बांधवांकडून ईदच्या खरेदीस वेग येतो. त्यानुसार दुसऱ्या खंडाच्या समारोपाने मुस्लिम बांधवांकडून ईदच्या तयारी वेग आला आहे.

घराची स्वच्छता करणे, रंगरंगोटी करणे, आकर्षक विद्युत रोषणाई करणे तसेच अन्य विविध प्रकारची जोरदार तयारी सुरू झाली आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

मशिदीमध्ये सुरू असलेल्या तरावीच्या नमाजमध्ये पठण करण्यात येणारे कुराण शरीफचे सुमारे २५ ते २७ पारे (अध्याय) पूर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT