drink2.jpg 
नाशिक

ऐकलंत का तळीरामांनो...उद्यापासून मद्याची दुकाने सुरु होणार बरं का!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूमुळे गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेली मद्यविक्री दुकाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग बुधवारी (ता. 6) मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने काढलेल्या आदेशानुसार शुक्रवार (ता. 8)पासून विक्रीस सुरवात होणार आहे. परवानाधारक सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत मद्याची विक्री करू शकणार आहेत. 

हमीपत्रदेखील देणे बंधनकारक असणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिनाभर मद्याची दुकाने बंद होती. सोमवारी (ता. 4) दारूची दुकाने उघडण्यात आली होती; परंतु नियमांचे उल्लंघन आणि तळीरामांची गर्दी यामुळे विक्रेत्यांवर अवघ्या दोन तासांत दुकाने बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे असा प्रकार टाळण्यासाठी एक्‍साइजने आता टोकन अथवा कूपनचा पर्याय निवडल्याची चर्चा होती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने काढलेल्या आदेशात मालेगाव महापालिका, शहरातील कंटेन्मेंट झोन, तसेच महापालिका, नगर परिषद हद्दीतील मॉल्स, बाजार संकुल आणि बाजारातील मद्यविक्रीची दुकाने वगळून उर्वरित भागातील दुकाने सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. विक्रेत्यास यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे. या सूचनाचे पालन होईल, असे हमीपत्रदेखील देणे बंधनकारक असणार आहे. यांसह शासनाने घालून दिलेल्या नियामांचा फलक हा दुकानाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेशदेखील या वेळी देण्यात आलेले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. 

मद्यविक्रीस असलेल्या सूचना 

- दुकानासमोर एकाच वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक असता कामा नये. 
- प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवावे. त्यासाठी सहा फुटांवर वर्तुळ आखावेत. 
- खरेदीकरिता येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्कॅनिंग करावे. 
- दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करावा. मास्क, हॅन्डग्लोजचा वापर करावा. 
- ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याकरिता सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT