नाशिक : आगामी महापालिका निवडणुक sakal
नाशिक

नाशिक : होर्डिंगच्या निविदा निघण्यापूर्वीच अटी- शर्ती बाहेर

महापालिकेच्या विविध कर विभागाची नाचक्की

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महत्त्वाच्या जागेवर होर्डिंग लावण्याच्या निविदा जाहीर होण्यापूर्वीच अटी व शर्तींचा पेपर सोशल मीडियावरून बाहेर पडल्याने विशेष व्यक्तींसाठी पायघड्या घालण्याचे विविध कर विभागाचा डाव यानिमित्त उघड झाला आहे. शहरात २८ ठिकाणी होर्डिंग लावण्यासाठी मोठा अनुभवाच्या कंपन्यांऐवजी दहा होर्डिंग्जची अट टाकून छोट्या कंपन्यांना दिली जाणारी चाल या विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारी ठरली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये थकबाकीदारांना सवलत देण्याबरोबरच दंडाच्या रक्कमेत तडजोडीचे धोरण स्वीकारले आहे. सुधारित अंदाजपत्रक तयार करताना मोठ्या प्रमाणात उत्पन्नात तूट दिसून आली. त्यात विविध कर विभाग वसुलीत सर्वात मागे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या विभागाकडून उत्पन्न वाढीसाठी मोठी अपेक्षा आहे.

त्या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेच्या जागेवर २८ ठिकाणी जाहिरात होर्डिंग लावण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. साधारण अकरा हजार चौरस फूट जागेच्या माध्यमातून महापालिकेला दहा वर्षांसाठी साधारण पाच कोटी रुपयांचा महसुल कायमस्वरूपी मिळेल, अशी व्यवस्था आहे. परंतु, अटी व शर्ती असलेला कागद सोशल मीडियावर जोरदार झळकत असल्याने होर्डिंग निविदेच्या या पेपर फुटीची चांगलीच चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

थकबाकीदारांसाठी पायघड्या

महापालिका हद्दीमध्ये २८ जागांवर होर्डिंग लावण्यासाठी काढल्या जाणाऱ्या निविदेतील अटी व शर्ती काय असतील, यासंदर्भातील एक कागद सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने विविध कर विभागातील लिकेज या निमित्ताने बाहेर आहे. होर्डिंग निविदेत परफेक्ट बसण्यासाठी दहा होर्डिंग महापालिका हद्दीत बसविण्याचा अनुभव असावा, ही प्रमुख अट टाकण्यात आली आहे. २८ जागांवर होर्डिंग बसविण्यासाठी तेवढ्याच ताकदीची कंपनी गरजेची असताना छोट्या प्लेअरला चाल देण्यासाठी अट टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. महापालिका हद्दीत दहा ते पंधरा होर्डिंग्ज असलेले अनेक महापालिकेचे थकबाकीदार असल्याने त्यांच्यासाठी अटी व शर्ती टाकण्यात आल्याची चर्चा होर्डिंग निविदेच्या पेपर फुटीच्या निमित्ताने होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT