nandgav nmc.jpg
nandgav nmc.jpg 
नाशिक

विक्रेते-पालिकेमध्ये ‘तू तू - मैं मैं’! ‘सबवे’साठी मार्केट पाडण्यावर पालिका ठाम; २६ ला सुनावणी

संजीव निकम

नाशिक : (नांदगाव) रेल्वेचे फाटक बंद करून उभारण्यात येणाऱ्या ‘सबवे’चा संभाव्य रस्त्याचा मार्ग काढण्यावरून मंगळवारी (ता. २०) पुन्हा एकदा मटण मार्केटमधील गाळेधारक आणि कारवाईसाठी गेलेल्या पालिका प्रशासनात संघर्ष झाला. या वेळी मुख्याधिकारी व विक्रेत्यांमध्ये ‘तू तू - मैं मैं’ झाली. 

‘सबवे’साठी मार्केट पाडण्यावर पालिका ठाम

‘सबवे’जवळ पालिकेच्या मालकीचे मटण मार्केट असून, ते मार्केट पाडण्यासाठी मोठा फौजफाटा व जेसीबी मशिन घेऊन मुख्याधिकारी पंकज गोसावी व पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक दुपारी पोचले. मार्केट रिकामे करून द्यावे, यासाठी या पथकाने सर्व तयारीनिशी कारवाईला प्रारंभ केला. मात्र गाळेधारकांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. पालिकेने सुचविलेल्या पर्यायाला गाळेधारकांचा विरोध असून, गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यावर २६ ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे. यामुळे सुनावणी बाकी असताना पालिकेला दांडगाईने कारवाई करता येणार नाही, असा पवित्रा मटण विक्रेत्यांनी घेत विरोध केला. मात्र त्याला न जुमानता पथकाने कारवाईचा निर्णय घेतल्याने मटण विक्रेत्यांनी तहसीलदार उदय कुलकर्णी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. 

गाळ्यांना कुलूप लावत मार्केट बंद

काही काळासाठी थांबलेली कारवाई दुपारी चारनंतर पुन्हा सुरू होऊन पोलिसांच्या मदतीने मार्केटच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून विक्रेत्यांना बाहेर काढत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. मात्र अधिकारी आणि कर्मचारी निघून गेल्यानंतर काही वेळातच विक्रेत्यांनी मार्केटमध्ये प्रवेश करून पुन्हा व्यवहार सुरू केले. त्यामुळे पालिकेची कारवाई फोटोसेशन ठरल्याची चर्चा होती. न्यायालयात सुनावणीची तारीख जवळ असताना पालिकेची कारवाईची दांडगाई उच्च न्यायालयात निदर्शनास आणून देऊ, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप यांनी दिली. तसेच कारवाईप्रसंगी पोलिसांनी विक्रेत्यांशी अरेरावी केल्याचा निषेध नोंदवित तहसीलदार कुलकर्णी यांना निवेदन दिले. तर मुख्याधिकारी गोसावी यांनी उच्च न्यायालयातील सुनावणी होईपर्यंत गाळ्यांना कुलूप लावत मार्केट बंद ठेवणार असल्याचे सांगितले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: ईव्हीएमबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : फ्रेझर-मॅकगर्कचं तुफानी अर्धशतक, दिल्लीची मुंबईविरुद्ध आक्रमक सुरुवात

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

SCROLL FOR NEXT