Boys Town Center provided by Department of Education for Typing, Shorthand and Computer Typing.  
नाशिक

Nashik Typing Exam: टायपिंग परीक्षा केंद्रावर सावळागोंधळ; टाईपरायटर नेण्यासही मज्जाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik Typing Exam: नाशिक जिल्हा परिषदेतर्फे शहर व जिल्ह्यात टायपिंगची परीक्षा घेण्यात येत आहे. नेहमी बी.डी. भालेकर व अन्य मध्यवर्ती केंद्रावर, सोयीच्या ठिकाणी होणारी या परिक्षेसाठी यंदा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बॉईज टाऊन शाळेत केंद्र दिल्याने विद्यार्थी व पालकांचा मोठा गोंधळ उडाला.

८ डिसेंबर २०२३ पासून बॉईज टाऊन येथे जिल्हा परिषदेतर्फे टंकलेखन, लघुलेखन व संगणक टायपिंगची परीक्षा घेण्यात येत आहे. (Confusion at Typing Exam Centre in nashik news)

ही परीक्षा केंद्र हे मध्यवर्ती बसस्थानकापासून खूपच दूरवर आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र सापडण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली. परीक्षा देणारे विद्यार्थी केवळ शहरातीलच नव्हे तर जिल्हाभरातील आहेत.

काही खेड्यापाड्यातील आहेत. त्यामुळे शाळेच्या पत्त्यावर विद्यार्थी वेळेवर न पोचल्यामुळे बऱ्याच जणांची फजिती झाली. त्याचबरोबर संस्थाचालकांना टाईपरायटर घेऊन जाण्यास परवानगी न दिल्यामुळे ती देखील एक मोठी फजिती झाली.

एवढेच नव्हे तर या शाळेमध्ये संस्थाचालक, पालक व विद्यार्थ्यांसोबत आलेल्या कुणालाही आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सदर शाळा प्रशासनासंदर्भात पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे केंद्र बदलून मिळावे अशी मागणी देखील करण्यात आली. यासंदर्भात नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.

टंकलेखन, लघुलेखन, संगणक टायपिंग परीक्षेसाठी संस्था चालकांना टाईपरायटर मशिन ठेवायला सुद्धा आत जाऊ दिले नाही. संस्थेच्या मशिनवर विद्यार्थी सहा महिने सराव करतो आणि परीक्षेत त्याला त्या मशिनवर बसू दिले गेले नाही. वणी, दिंडोरी, सिन्नर, निफाड, दोडी बु., कळवण, सटाणा येथून लांबून विद्यार्थी सीबीएसला आले. तेथून केंद्र सापडत नसल्याने १०० ते १५० रुपये रिक्षावाल्याला द्यावे लागले.

सीबीएस जवळ शाळा कॉलेज असून लांब केंद्र का दिले? लघुलेखन परीक्षेवेळी रेकाॅर्डींग आवाज नीट ऐकू न आल्याने नापास होणार अशी भीती विद्यार्थी व्यक्त करत होते. विद्यार्थी, परीक्षा कडक वातावरणात घेतल्या तरी चालतील पण केंद्र, केंद्र संचालक यांची सहकार्य करण्याची भूमिका असावी असे मत सर्वांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT