ZP Nashik esakal
नाशिक

Nashik News : ZP ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सावळागोंधळ! एकाच अभियंत्यांकडे तीन-तीन विभागांचा पदभार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजना राबवित असलेल्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कामकाजाचा सावळागोंधळ सुरू आहे. या विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा पदभार देण्यावरून खेळ रंगला असताना, आता विभागातील एकाच शाखा अभियंत्यांकडे तीन-तीन तालुक्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे.

अनुकंपा तत्त्वावरील तसेच बांधकाम विभागातील अभियंता वर्ग होऊन एकाच शाखा अभियंत्यावर मर्जी बहाल केल्याने विभागांतर्गत अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या गोंधळात जलजीवन मिशनची कामे तांत्रिकदृष्ट्या कशी पूर्ण होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. (Confusion in ZP rural water supply department Three departments in charge of one engineer Nashik News)

जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशन योजनेतील तब्बल शंभर योजना अद्याप सुरू झालेल्या नाहीत. दुसरीकडे कार्यकारी अभियंता पदाच्या पदभारावरून विभागात खेळखंडोबा सुरू आहे. कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर यांची बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार मालेगावचे उपअभियंता आर. व्ही. महाजन यांच्याकडे सोपविला.

मात्र, आठवडाभरातच तो बांधकाम कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला. आता पुन्हा हा पदभार नाशिक उपअभियंता डी. एल. अंधारे यांच्याकडे देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून राजकीय हालचाली सुरू असतानाच प्रशासनाकडून मात्र हा पदभार नगर महाराष्ट्र प्रधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे देण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच, अनेकांनी मंत्रालयातूनही कार्यकारी अभियंतापदासाठी फिल्डिंग लावली आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

त्यातच विभागात दुसरीकडे एकाच शाखा अभियंत्यांकडे तीन-तीन तालुक्यांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. कोणतेही तांत्रिक ज्ञानाचे मूल्यमापन न करता शाखा अभियंता यांच्याकडे उपअभियंता कार्यभारदेखील सोपविला गेला असल्याचे समजते.

एका शाखा अभियंत्यांकडे पेठ व नाशिक तालुक्याचा पदभार देण्यात आला आहे. नाशिक उपविभागातही उपअभियंतापदाचा कार्यभार याच अभियंत्यांकडे दिलेला आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे तीन पदांचा पदभार दिला आहे.

बांधकाम विभागातील स्थापत्य सहाय्यकांना ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यातून ११ अभियंता, तसेच अनुकंपा तत्त्वावरील नऊ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मिळाले आहेत. असे असतानाही एकाच शाखा अभियंत्यांकडे तीन विभागांचा पदभार दिल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT