Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : अभोण्याच्या सहायक निरीक्षकासह शिपाई ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; स्वीकारली 10 हजारांची लाच

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : नाशिक ग्रामीण पोलिस दलातील अभोणा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल या दोघांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगहाथ अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरची कारवाई पोलीस ठाण्यातच केली. (Constable with Assistant Inspector of Abhona arrested in bribe crime news nashik )

नितिन जगन्नाथ शिंदे (39, रा. सावली निवास, गणेशनगर, अभोणा, ता. कळवण), कुमार गोविंद जाधव (42, रा. अभोणा पोलीस स्टेशन वसाहत, अभोणा, ता. कळवण) अशी दोघा लाचखोर पोलीसांची नावे आहेत.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्याच्याविरोधात अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार, गुन्हा दाखल न करण्यासाठी दोघा लाचखोरांनी तक्रारदाराकडे गेल्या शनिवारी (ता. २) १० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, पथकाने पडताळणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार रविवारी (ता. ३) अभोणा पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा लावण्यात आला. पोलीस ठाण्यातच पोलीस कॉन्स्टेबल जाधव याने १० हजारांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने त्यास अटक केली.

चौकशीतून जाधव याने सहायक पोलीस निरीक्षक शिंदे याच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांना पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी अभोणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षख श्रीमती निलिमा डोळस, हवालदार पंकज पळशिकर, नितीन कराड, सुरेश चव्हाण यांनी कामगिरी बजावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT