construction work esakal
नाशिक

सणासुदीमुळे बांधकाम व्यवसायात कोट्यावधींच्या उलाढालीचे संकेत

विक्रांत मते

नाशिक : कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second wave) ओसरल्यानंतर शहरातील बिघडलेले अर्थचक्र पूर्वपदावर येत असताना या चक्राला गती देण्याचे काम विजयादशमीच्या मुहूर्तावर झाले. शहरात सुरू असलेल्या दीडशेहून अधिक प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात बुकिंग होऊन येत्या काळात शंभर ते सव्वाशे कोटींची उलाढालीचे संकेत मिळाले. भविष्यात विविध प्रकल्प होवू घातल्याने त्याचा देखील परिणाम रिअल इस्टेटच्या (Real Estate) क्षेत्रावर दिसून आला.

गणेशोत्सवापासून रिअल इस्टेट क्षेत्राला पुन्हा झळाळी

गेल्या वर्षी कोरोनाने हाहाकार उडविल्याने तब्बल साडे तीन महिने उद्योग, व्यवसाय बंद होते. दिवाळीत अर्थचक्राला गती मिळाली खरी, परंतु त्या जानेवारी महिन्याच्या अखेरपासून पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने गती मंदावली. त्यानंतर पुन्हा दीड ते दोन महिने व्यवहार ठप्प झाले. मे अखेरपर्यंत कोरोना संसर्गाचा वेग कायम राहिला. त्यानंतर परिस्थितीत वेगाने फरक पडला. आर्थिक व्यवहारदेखील सुरळीत झाले. कोरोना तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी त्याला न जुमानता अर्थचक्रावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. गणेशोत्सवापासून रिअल इस्टेट क्षेत्राला पुन्हा झळाळी प्राप्त होण्यास सुरवात झाली. विजयादशमी व त्यानंतरच्या दिवाळीच्या मुहूर्तावर रिअल इस्टेट बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल असे संकेत होते. विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याने संकेत खरे ठरले आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांवर आज बुकिंग झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुहूर्तावर दीडशेच्या आसपास नवीन घरांचे बुकिंग झाले. दिवाळीपर्यंत घरांना आणखी मागणी वाढून शंभर, सव्वाशे कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

प्रकल्पांच्या घोषणेने तेजी

नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे, टायर बेस मेट्रो, सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग व नाशिकमधून या महामार्गाचा होणारा २८ किलोमीटरचा प्रवास, नाशिकहून देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडलेली हवाई सेवा, समृद्धी महामार्ग व समृद्धी महामार्गाच्या बाजूने प्रस्तावित नागपूर- मुंबई बुलेट ट्रेन, नाशिक- मुंबई महामार्गाचे कॉक्रिंटीकरण आदी प्रकल्पांमुळे नाशिक विकास अधिक वेगाने होईल. त्यामुळे आताच आवाक्यात असलेल्या किमतींमुळे घरे खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचे बाजारात दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT