Real Estate 
नाशिक

दिवाळीत रिअल इस्टेटला बूस्ट; ग्राहकांसाठी बांधकाम कंपन्यांकडून विविध योजना

विक्रांत मते

नाशिक :  लॉकडाउननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने उद्योगव्यवसाय पुन्हा उभारी घेत असून, दिवाळीनिमित्त खरेदीदारांची संख्या वाढल्याने रिअल इस्टेटला बूस्टर डोस मिळत आहे. सात महिन्यांपासून मंदीच्या गर्तेत सापडलेल्या बांधकाम व्यवसायाला दसऱ्यानंतर ऊर्जितावस्था प्राप्त होत आहे.

शहरात सध्या पाचशेहून अधिक बांधकामांचे प्रकल्प सुरू असून, तेथील बुकिंग जवळपास फुल झाले आहे. दिवाळीच्या पुढील चार दिवसांत मुहूर्ताची खरेदी करण्यासाठी ग्राहक सरसावले आहेत. गंगापूर, चांदशी, मखमलाबाद, कामटवाडे, पाथर्डी व वडाळा शिवारात वास्तव्याला अधिक पसंती मिळत आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर याच भागात सर्वाधिक नवीन प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. घरांची वाढती मागणी लक्षात घेता बांधकाम व्यावसायिकांनी विविध योजना बाजारात आणल्या आहेत. घर खरेदीवर ताबा मिळत नाही, तोपर्यंत ठराविक रक्कम खरेदीदारांना मिळणार आहे. सोने, चारचाकी व दुचाकी, घरांच्या हप्त्यांमध्ये सवलत, मुद्रांक, जीएसटीमध्ये सवलत आदी योजना ग्राहकांना आकर्षित करत आहेत. 

औद्योगिक क्षेत्रात ओव्हर टाइम 

सातपूर, अंबड औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांना पाच दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली असली तरी उत्पादन मात्र सुरू आहे. जे कामगार सुटी असूनही कामावर हजर राहतील त्यांच्यासाठी दुप्पट वेतनासह ओव्हर टाइमही दिले जात आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत महिंद्र, बॉश व सीएट हे महत्त्वाचे उद्योग असून, या उद्योगांवर छोटे २४० हून अधिक उद्योग अवलंबून आहे. या मोठ्या कंपन्या सुरू असल्याने व्हेंडरला देखील काम मिळाल्याने छोट्या कंपन्यांमधील यंत्रांचा खडखडाट थांबलेला नाही. 

तीन दिवस बॅंकांना सुटी 

लक्ष्मीपूजन, रविवारची साप्ताहिक सुटी व सोमवारी पाडवा असल्याने बॅंकांचे कामकाज तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारपूर्वी बॅंकांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी वाढली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT