construction
construction esakal
नाशिक

Unlock Nashik : बांधकाम व्यवसायाला ‘अच्छे दिन’ येणार?

विक्रांत मते

नाशिक : लॉकडाऊन (lockdown) व पुन्हा अनलॉक (unlock nashik) प्रक्रियेकडे जात असताना शहरात आघाडीवरील बांधकाम व्यवसायाला घरघर लागली, परंतु घरांची (house price) वाढती गरज लक्षात घेता येत्या काळात पुन्हा उभारी घेऊन अच्छे दिन येतील, असा विश्‍वास बांधकाम व्यावसायिकांना आहे. किंबहुना उलट कोरोनामुळे (corona) नाशिकमध्ये घरांना अधिक मागणी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (construction-business-will-increased-after-unlock-nashik-marathi-news)

बांधकाम व्यवसायाला अच्छे दिन येण्याची चिन्हे

कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे ढीग साचत असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला वर्षभर नवीन बांधकामांना परवानगी न देण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार वर्षभरात एकही परवानगी मिळाली नाही. २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बांधकामातील कपाटाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याने तेथून पुढे चार वर्षे बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याअभावी शेकडो इमारती पडून होत्या. २०१६ पासून पुढे सातत्याने बांधकाम साहित्याचे दर वाढले, तर जागतिक मंदीला सामोरे जावे लागल्याने घरांना मागणी घटली. २०१७ मध्ये महापालिकेसाठी विकास आराखडा मंजूर झाला. त्यात नऊ मीटरखालील रुंदीच्या रस्त्यावर टीडीआर घेण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट आली. या लाटेने दोन महिन्यांसाठी लॉकडाउन जाहीर केल्याने बांधकाम व्यवसाय पूर्णतः: बुडाला अशी धारणा झाली. परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर बांधकामे पुन्हा सुरु झाली व पूर्वीप्रमाणेच व्यवसायाची गाडी रुळावर आली. निर्माण होणाऱ्या एक ना अनेक समस्या सुटत असताना राज्य शासनाने नोव्हेंबर २०२० मध्ये संपूर्ण राज्यासाठी एकच विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याने त्यात अधिकचा एफएसआय देण्यात आल्याने बांधकाम व्यवसायाला अच्छे दिन येण्याची चिन्हे निर्माण झाली. दुसऱ्या लाटेने पुन्हा लॉकडाउन जाहीर झाल्याने निराशा निर्माण झाली. या परिस्थितीत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून, नव्या दमाने व्यवसाय भरारी घेण्यास सज्ज झाला आहे.

हजारो हातांना काम, करोडोंची उलाढाल

बांधकाम व्यवसायावर सव्वाशे छोटे-मोठे व्यवसाय अवलंबून आहे. मजुरी करणाऱ्या व्यक्तींपासून ते कौशल्य विकसित असलेल्या व्यक्तींचा रोजगार या व्यवसायावर अवलंबून आहे. सिमेंट, स्टील, विटा, रेती, खडी, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक्स, प्लायवूड, हार्डवेअर, पेंटर, ट्रान्स्पोर्ट, टाइल्स, काच, फॅब्रिकेशन आदींच्या खरेदी-विक्रीतून करोडो रुपयांची उलाढाल व रोजगार उपलब्ध होतो. लॉकडाउन काळात बांधकामांना मर्यादित स्वरूपात परवानगी असली तरी सप्लायर्सकडून होणारा पुरवठा बंद असल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला. परंतु, घरांची मागणी अधिक वाढणार असल्याने दिवाळीपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

नाशिकमध्ये घरांना मागणी

कोरोनामुळे आता गर्दीच्या ठिकाणाहून मोकळ्या व सुरक्षित ठिकाणी राहण्यास पसंती मिळत आहे. मुंबई, पुणे व ठाणे शहरापासून नाशिक नजीकच्या अंतरावर असल्याने नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने या शहरांमध्ये राहून नाशिक मध्ये कुटुंबे सुरक्षित ठेवण्याकडे कल असल्याने घरांना मागणी वाढतं आहे.

पहिल्या लॉकडाउननंतर राज्य सरकारने सवलती दिल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून आला. आता बांधकाम साहित्याचे दर वाढत असताना सरकारने मध्यस्ती करून मदत करणे गरजेचे आहे. बांधकाम व्यवसाय पूर्वपदावर आला आहे. मजुरांची अडचण आहे, परंतु येत्या काळात ती अडचण दूर होईल. - अनिल आहेर, परफेक्ट बिल्डकॉन.

नाशिकमध्ये घरांना सातत्याने मागणी वाढत आहे. वाढत्या पायाभूत सुविधांचा विचार करताना मुंबई, पुणेनंतर नाशिक हाच एकमेव पर्याय असल्याने येथे वास्तव्य करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे येत्याकाळात व्यवसायवृद्धी अधिक गतीने होईल. - कृणाल पाटील, श्रध्दा डेव्हलपर्स.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT