Construction of Saiyatri Residence and Multipurpose Hall. esakal
नाशिक

Nashik News : शिर्डीच्या साईभक्तांसाठी खोपडी अन् पाथरे येथे यात्री निवासची उभारणी

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी अहोरात्र भाविकांचा राबता असतो. मुंबई, नाशिक व गुजरातकडून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (न्हाई) तर्फे सिन्नर ते शिर्डी दरम्यान, महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे वाहनांनी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर होणार आहे.

पदयात्रींसाठी सिन्नर येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीपासून सावळीविहीरपर्यंत जवळपास ५९ किलोमीटरचा स्वतंत्र पालखी मार्ग समांतर साकारण्यात आला आहे. या पदयात्रींचा प्रवास सुखकर बनवण्यासाठी खोपडी व पाथरे येथे पालखी मार्गालगत अद्ययावत साईयात्री निवासाची उभारणी करण्यात आली आहे. (Construction of Yatri Niwas at Khopdi and Pathare for Sai Devotees of Shirdi Nashik News)

यात्रीनिवासामध्ये पदयात्रींच्या निवास व मुक्कामाची सोय होणार आहे. शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या मोंटेकार्लो कंपनीतर्फे खोपडी व पाथरे येथे स्वतंत्रपणे दोन साईभक्त निवासांचे बांधकाम करण्यात आले झाले आहे. प्रत्येक ठिकाणी दोन एकर जागेत सुमारे आठ हजार चौरस मीटर इतके साईयात्री निवास आहे.

एका ठिकाणच्या बांधकामाचा खर्च जवळपास सात कोटी रुपये इतका आहे. बांधकामात ३२ खोल्यांची बहुमजली मुख्य इमारत आहे. इमारतीत प्रत्येक खोलीत स्वतंत्र शौचालय आणि स्वच्छतागृह, स्नानगृहाची सुविधा आहे. याव्यतिरिक्त आवारात पुरुषांसाठी चार शौचालय, चार स्नानगृह व नऊ युनिटची स्वच्छतागृह अतिरिक्त आहेत.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

महिलांसाठी आठ शौचालय व चार स्नानगृह आहेत. २० बाय २५ मीटरचे बहुउद्देशीय सभागृह आहे. तेवढेच मोठे भोजनगृह साकारण्यात आले आहे. बहुउद्देशीय सभागृहात पालखी विसावा व पदयात्रींच्या विश्रांतीची सोय होईल. भोजनगृहात स्वयंपाकगृह उपलब्ध असेल. बहुमजली इमारतीत सुरक्षा व व्यवस्थापन कक्ष, वैद्यकीय मदत कक्ष आहे. मुबलक पाणीसाठा करण्याची व्यवस्था इथे आहे.

पालखीसोबत असलेल्या वाहनांची ‘पार्किंग’ ची व्यवस्था यात्रीनिवासच्या आवारात होईल. हा संपूर्ण परिसर संरक्षक भिंतीने बंदिस्त केला असेल. साई पदयात्रीसोबत रस्त्याने जाणाऱ्या इतर भाविकांची मुक्काम व विश्रांतीची सोय होईल. या शिवाय स्थानिकांना परवानगी घेऊन मंगल कार्यालयाप्रमाणे या इमारतीचा वापर करणे शक्य होणार आहे.

शिर्डीला येणारे पदयात्री मुक्कामासाठी उघड्यावर अथवा शाळेत थांबतात. त्यांना तेथे नेहमी असुरक्षितता व गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यामुळे पालखी मार्गाला लागून खोपडी व पाथरे येथे अद्ययावत यात्रीनिवास साकारण्याची योजना महामार्ग विभागाने आखली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी मंजुरी देत स्थानिक ग्रामपंचायतींच्या सहकार्याने हा प्रश्न निकाली काढला.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानतर्फे या ठिकाणी व्यवस्थापन करता येईल का? या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास या ठिकाणी दुपारी व सायंकाळी थांबणाऱ्या पदयात्रींना शिर्डी येथील साईभोजनगृहातील प्रसाद उपलब्ध करून देता येईल. संस्थानच्या सहकार्यातून इथे वैद्यकीय पथकदेखील उपलब्ध असेल. त्याचा फायदा इतर भाविक व स्थानिकांनाही मिळेल असे प्रयत्न सुरू आहेत, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

आस्तिक शांत-तेजस्वी असतो

आस्तिको निःस्पृहो योगी प्रभुकार्ये सदा रतः ।

दक्षो शान्तश्च तेजस्वी प्रभुप्रचारको भवेत् ॥

भक्तीविषयक हा संस्कृत श्‍लोक आहे. अर्थात, आस्तिक हा नि:स्वार्थी योगी असतो जो सदैव परमेश्वराच्या सेवेत मग्न असतो. तो कुशल, शांत, तेजस्वी आणि परमेश्वराचा उपदेशक असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT