PWD latest marathi news esakal
नाशिक

‘PWD’च्या जाचाने ठेकेदार ‘बेजार’!; 2 वर्षांपासून देयके थकीत

सकाळ वृत्तसेवा

कळवण (जि. नाशिक) : नाशिक सार्वजनिक बांधकाम, कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग व मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शासकीय कामे करणाऱ्या ठेकेदारांना गेल्या दोन वर्षांपासून कामाची देयके वेळेवर मिळत नसल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

या प्रकरणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मालेगाव सेंटरचे आजी- माजी पदाधिकारी, सदस्य आक्रमक झाले असून, त्यांनी देयकांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारी सर्व शासकीय कामे बंद ठेवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Contractor disgusted by PWD Payment overdue for 2 years Nashik Latest Marathi News)

नाशिक विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. देयके मिळविण्यासह १८ टक्के जीएसटी, ईएमडीची रक्कम वेळेवर मिळावी, खाणपट्ट्यासंदर्भातील अटी, सुरक्षा अनामत आदी प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी मालेगाव सेंटरचे अध्यक्ष समाधान अहिरराव यांनी केली आहे.

नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार दोन वर्षांपासून वादात सापडला आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे विभागाची वाट लागली आहे. दोन वर्षांपासून राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याचे सांगत स्थानिक अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांना कामांची देयके देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ठेकेदारांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमाप्रमाणे जर सरकारचा खाणपट्टा उपलब्ध असेल, तर त्याचा निविदेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीसह उल्लेख करण्यात यावा, अशी अट टाकण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात नाशिकच्या आसपास कुठेही शासकीय खाणपट्टा उपलब्ध नाही. ठेकेदारांना साहित्य २५ ते ३० किलोमीटर अंतरावरून आणावे लागते. त्यामुळे अंदाजपत्रकात ‘लीड चार्जेस’च्या हिशेबाचा समावेश करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या वेळी रमेश शिरसाठ, भूषण पगार, धिरेन पगार, संदीप भुसे, महेंद्र पाटील, दीपक सोनवणे, हेमंत पाळेकर, रवींद्र आहेर, अल्पेश शहा, मधुकर पाटील, आबा सूर्यवंशी, विजय गुंजाळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT