Builders Association President Vijay Baviskar, Avinash Patil, Ramesh Shirasath etc. while giving a statement to the Superintending Engineer of Public Works Department Arundhati Sharma. esakal
नाशिक

Nashik News: ठेकेदार मंत्रालयासमोर 2 दिवस करणार आंदोलन; बिल्डर्स असोसिएशनचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : काम पूर्ण करूनही दोन वर्षांपासून बिले प्रलंबित असलेल्या ठेकेदारांनी तीन दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागासमोर सुरू केलेल्या आंदोलनाची दिशा आता मंत्रालयाकडे वळली आहे.

२६ व २७ जुलैला मंत्रालयासमोरील आझाद मैदानावर आंदोलनाचा निर्णय या ठेकेदारांनी घेतला असून, त्यात राज्यातील ठेकेदार सहभागी होतील. (Contractors will protest for 2 days in front of Ministry Decision of Builders Association Nashik News)

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करीत आहेत.

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आमदार, खासदारांसह नेत्यांनी पाठ फिरवल्याची नाराजी या ठेकेदारांनी व्यक्त केल्यावर अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी आज ठेकेदारांच्या आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारले. त्यांचे प्रश्न समजून घेत नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांच्या प्रश्नांबाबत सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, जिल्ह्यातील ठेकेदारांचे ५८७ कोटी रुपये राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. काम पूर्ण झालेल्या ठेकेदारांना देण्यासाठी राज्य शासनाकडे पैसे नाहीत आणि दुसरीकडे कामे मंजूर करण्याचा सपाटा आजही सुरूच आहे.

त्यामुळे दरवर्षी दायित्वाचे प्रमाण वाढत असल्याने या ठेकेदारांनी केलेल्या कामांचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला. हा संपूर्ण राज्यातील ठेकेदारांचा प्रश्न असल्याने सर्व जिल्ह्यांतील ठेकेदार आता मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष विजय बाविस्कर यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, अभय चोकसी, राहुल सूर्यवंशी, रमेश शिरसाठ, संजय आव्हाड, शशिकांत आव्हाड, अजित सकाळे, जी. जी. काटकर, प्रशांत सोनजे, योगेश पाटील, संदीप दरभोडे, राजू कुऱ्हाडे, महेंद्र पाटील, राजेंद्र मुथा, सुधाकर मुळाणे, विलास निफाडे, प्रकाश बनकर आदी सहभागी झाले आहेत.

काँग्रेसचा पाठिंबा

राज्यातील ठेकेदारांना वाऱ्यावर सोडून आमदार, खासदार आजही बांधकाम विभागाची कामे मंजूर करीत आहेत. त्यांना या ठेकेदारांचे प्रश्न सोडविण्याची मानसिकता राहिलेली नाही.

अशा सरकारविरोधात आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असे आश्वासन देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी ठेकेदारांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT