salary esakal
नाशिक

Nashik News : कंत्राटी वैद्यकीय अधिकारी 4 महिन्यांपासून वेतन थकीत

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकले आहे. चार महिन्यांचे वेतन थकल्याने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

यातच, कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्रासाठी जिल्हा परिषदेत खेटा घालाव्या लागत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची तपासणी करायची की, वेतन मिळविण्यासाठी भांडायचे असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. (Contractual Medical Officer salary arrears since 4 months nashik news)

जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन वेळात होत नाही हा प्रश्न जुना आहे. वारंवार या प्रश्नांवर चर्चा होते. परंतु, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार पात्रतेनुसार वेतन निश्चिती आहे. यामध्ये एमबीबीएसच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ७० हजार रुपये तर बीएएमएसच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ४० हजार रुपये इतके वेतन आहे.

हे वेतन राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेकडे येते आणि तेथून शासकीय कोशागारातून यांना मिळत असते. आरोग्य विभागाच्या अधिनस्त जिल्हाभरात एकूण २९३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामध्ये सध्या २५४ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून ३९ जागा रिक्त आहेत.

२५४ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी १९८ हे कायमस्वरूपी आहेत तर ५६ वैद्यकीय अधिकारी कंत्राटी आहेत. या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑक्टोबरपासून वेतन मिळालेले नसल्याने हे वैद्यकीय अधिकारी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तत्काळ वेतन अदा करावे अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

''वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतनाबाबत राज्य शासनाकडे आपण पाठपुरावा करत सुरू आहे. वेतनाचा काही निधी प्राप्त झालेला आहे. येत्या दोन दिवसात यातून वेतन दिले जाईल.''- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्यात उपोषणाला सुरुवात

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT