Controversy in jalgaon
Controversy in jalgaon  esakal
नाशिक

सोशल मीडियावरील वादग्रस्त स्टेटसमुळे तणाव; वादाचे रूपांतर हाणामारीत

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : शिरसोली (ता. जळगाव) गावात एका तरुणाने सोशल मीडियावर (Social media) ठेवलेल्या स्टेटसवरून दोन समुदायात गैरसमज पसरला. वादाचे रूपांतर हाणामारीत आणि नंतर दगडफेक झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी पोलिसांनी वेळीच धाव घेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. रविवारी (ता. १७) गावात शांतता कमिटीची बैठक झाली. देशात आणि राज्यातील राजकारणाचे वाद आपल्या गावासाठी नाही, असा सुर या बैठकीत उमटला.

तुफान दगडफेक, एक जखमी

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका व्हॉटसॲप ग्रुपवर स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात काही तरुणांनी मारहाण केली, यात काही तरुणांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. वाद शांत झाल्यावर अफवा पसरवल्याने काही तरुणांनी मलिकनगर व नशेमन कॉलनीत दगडफेक केली. दगडफेकीत रईस युसूफ मणियार यांच्या मालकीची (एमएच १९ सीवाय २७९९) आयशर ट्रक व डॉ. सुफीयान शाहा यांच्या मालकीची चारचाकी क्रमांक (एमएच ०३ एआर १५०८) च्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी (वय १८) हा तरुण रस्त्याने मलिकनगरमध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला आहे. शिरसोली गावात हनुमान जयंतीनिमित्त पोलिस बंदोबस्त असल्याने एमआयडीसी पोलिस लागलीच घटनास्थळी पोचले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनीस शेख यांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद शांत केला. घटनेची माहिती कळताच निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह पोलिस कुमक दाखल झाली.

...ते राजकारण गावासाठी नाही

अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, साहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, निरीक्षक अरुण धनवडे यांच्या उपस्थितीत दोन्ही समुदायातील ग्रामस्थांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली. दोन्ही समुदायातील मान्यवरांनी यावेळी आपापले मनोगत मांडले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांचा दोष असेल तर त्यांना शिक्षा होईलच. तसेच देशात आणि राज्यात जे राजकारण घडतेय ते आपल्या गावासाठी नाहीच, असा एकमुखी पवित्रा शिरसोली वासियांनी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT