Dog
Dog esakal
नाशिक

Nashik News : पाळीव श्वानांवरून जॉगिंग ट्रॅकवर वाद! ज्येष्ठ नागरिकांची पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पवननगर येथील जॉगिंग ट्रॅक येथे पाळीव श्वान फिरविण्यासाठी येणारे व मैदानावर जॉगिंग करण्यासाठी येणाऱ्यांमध्ये रविवारी (ता. १४) सकाळी वादाचा प्रकार घडला. मैदानावर शेकडो महिला-पुरुषांसह लहान मुले जॉगिंग व खेळण्यासाठी येतात.

त्याचवेळी काही जण आज मैदानावर पाळीव श्वान घेऊन आले. हे श्‍वान ट्रॅकवर फिरताना घाण करीत असल्याने व धावून जात असल्याने त्यातून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिक संबंधित श्वान मालकांना समजावीत असताना त्यांच्यात वादावादी झाल्याचा प्रकार घडला. (Controversy on jogging track over pet dogs Complaint of senior citizen to police Nashik News)

सिडकोत पवननगर येथे जॉगिंग ट्रॅक आहे. याठिकाणी पहाटेपासून शेकडो महिला-पुरुष जॉगिंगसाठी येतात. त्याशिवाय या मैदानावर हास्य क्लबही चालतो. मैदानाच्या सभोवती जॉगिंगसाठी ट्रॅक करण्यात आलेला आहे.

मध्यभागी मैदान असून मैदानात सकाळच्या वेळेत हास्य क्लब सुरू असतो. तर शाळांना सुट्ट्या असल्याने आता मुलेही खेळण्यासाठी येत असतात. मैदानात ग्रीन जिमचीही सोय करण्यात आलेली आहे. मैदानात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ज्येष्ठ नागरिक जागरूक असतात.

असा घडला प्रकार

रविवारी (ता. १४) सकाळी नित्यनेमाने नागरिक जॉगिंग करीत असताना काही श्वान मालक त्यांचे श्वान घेऊन मैदानावर आले. यातील एका युवतीच्या हातातून श्वान निसटले. ते जॉगिंग ट्रॅकवर धावू लागले.

श्वान धावत असल्याने जॉगिंग करणाऱ्या काही पुरुष-महिलांमध्ये काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले. तर, त्यामुळे ग्रीन जिमवर व्यायाम करणाऱ्या व जॉगिंग करणाऱ्या काही जागरूक नागरिकांनी श्वान मालकांना हटकले आणि मैदानावर श्वान आणू नये.

श्वान आल्याने मैदानात घाण होते. याठिकाणी महिला-पुरुष जॉगिंग करतात. त्याचा त्रास होतो. तसेच, श्‍वानाने चावा घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानात श्वान आणू नये असे संबंधितांना सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु, संबंधितांनी आडमुठेपणाची भूमिका घेत, तसा नियम असेल तर सांगा अन्यथा आम्ही आपले श्वान दररोज मैदानावर आणूच अशी भूमिका घेतल्याने वाद वाढत गेला. काही ज्येष्ठ नागरिकांनी थेट पोलिसात तक्रार केल्याचे समजते.

"श्वानाला मैदानावर आणण्याचे काहीएक कारण नाही. पाळीव असले तरी ते मैदानावर येऊन घाण करणार. त्याचा त्रास जॉगिंगसाठी येणाऱ्यांना होतो. त्यामुळे पाळीव जरी असले तरी त्यांनी ते मैदानात न आणता रस्त्यालगत फिरवावे."

- सुभाष गायकवाड, श्रीराम जॉगिंग ग्रुप, पवननगर मैदान.

"पाळीव असले तरी श्वानाला मैदानावर आणणे चुकीचे आहे. त्यास लस दिली असल्याचे संबंधित सांगतात. याचा अर्थ त्यांच्या श्वानाने जॉगिंगसाठी येणाऱ्यांना चावा घेऊ द्यावा का? लहान मुले मैदानावर असतात. ते घाबरून जातात." - साहेबराव चव्हाण, ज्येष्ठ नागरिक

"या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले तेव्हापासून या मैदानावर पाळीव श्वान फिरण्यासाठी आणू नये, असे ठरविण्यात आले होते. तरीही कोणी श्वान आणून मैदानात घाण करीत असेल तर त्यासंदर्भात महापालिका व पोलिसांकडे रीतसर तक्रार करण्यात येईल."

- विनायक क्षीरसागर, अध्यक्ष, अष्टविनायक हास्यक्लब, पवननगर मैदान

"मैदानावर फिरण्यासाठी वयोवृद्ध पुरुष व महिला असतात. लहान मुले असतात. पाळीव असले तरी ते श्वानच. त्यामुळे त्यांच्यापासून चावण्याचा धोका असतोच. त्यामुळे मैदानावर श्वान आणू नये." - सुनील गुलाणे, ज्येष्ठ नागरिक.

"मैदान हे काही श्‍वानासाठी नाही. श्‍वान घेऊन येतात म्हणजे ते श्‍वान मैदानात घाण करतात. त्यामुळे मैदानाची शोभा जाते. घाण होते. सकाळी-सकाळी नागरिक मैदानावर फिरण्यासाठी येत असतील तर त्यांच्यासाठी हे धोकादायकच आहे. महापालिकेने अशा श्‍वान मालकांवर रीतसर कारवाई करावी." - गोपीचंद कुमावत, सदस्य, श्रीराम जॉगर्स ग्रुप

"श्वान मैदानावर न आणता इतरत्र फिरवावे. जेथे तो घाण करू शकेल. मैदान ही काही त्याची जागा नाही. असेच समजावून सांगितले जात असताना संबंधित श्वान पालक हे ज्येष्ठांशी अरेरावीने बोलत होते. मैदानावर येणाऱ्या प्रत्येकाने शिस्तीचे पालन करायला पाहिजे."

- भरत बावीस्कर, ज्येष्ठ नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT