ndcc-bank-nashik esakal
नाशिक

नाशिक : सहकार विभागाची 182 कोटींच्या वसुलीला स्थगिती

सकाळ वृत्तसेवा


नाशिक : जिल्हा बँकेचे ३४७ कोटी रुपयांच्या अनियमित कर्ज वाटप करणाऱ्या संचालक व अधिकाऱ्यांकडून १८२ कोटी रुपयांची वसुली करुन घेण्याप्रकरणी सहकार विभागाने वसुलीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे बँकेच्या माजी संचालकांना दिलासा मिळाला आहे. या संचालकांमध्ये आजी, माजी आमदार, खासदार यांचा समावेश आहे.

सहकार विभागाने सुनावणीसाठी दिला होता 15 दिवसांचा वेळ

जिल्हा बँकेच्या ३४७ कोटींच्या अनियमित कर्ज वितरण प्रकरणी तत्कालीन जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्या अध्यक्षतेखाली कलम ८८ अतंर्गत चौकशी सुरू होती. डिसेंबर २०२१ महिन्यात चौकशी पूर्ण झाल्यानंतर बलसाने यांनी जानेवारीमध्ये चौकशी अहवाल विभागीय सहनिंबधक यांच्याकडे सादर केला होता. या अहवालामध्ये बँकेच्या २९ माजी संचालक आणि १५ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर १८२ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. सदरचा अहवाल अमान्य करत काही माजी संचालक यांनी याप्रकरणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपिल दाखल केले होते. सहकार विभागाने सुनावणीसाठी १५ दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर १८२ कोटी रूपयांच्या वसुलीबाबत सहकार विभागास कुठल्याही सूचना नसल्याने विभागीय निबंधक यांनी कलम ९८ नुसार वसुलीची कार्यवाही करत संचालकांना नोटीस पाठवित १८ फेब्रुवारीपर्यंत पैसै जमा करण्याची मुदत दिली होती. गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. मात्र संचालकांच्या मागणीला प्रतिसाद मिळाला नव्हता.

अखेर १८२ कोटी रूपयांच्या वसुलीप्रकरणी माजी संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी वसुलीस तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे या संचालकांवरील सहकार विभागाकडून वसुलीसाठी करण्यात येणाऱ्या कारवाईला आता ब्रेक बसला आहे.

हे आहेत संचालक....

राजेंद्र डोखळे, संदीप गुळवे, माजी आमदार जे.पी.गावित, माणिकराव बोरस्ते, नानासाहेब सोनवणे, धनंजय पवार, माजी आमदार शिरिष कोतवाल, वैशाली कदम, माजी आमदार वसंत गिते, शोभा बच्छाव, दिलीप ढिकले, आमदार डॉ. राहूल आहेर, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, नानासाहेब पाटील, अद्वय हिरे, माजी आमदार प्रशांत हिरे, दत्ता गायकवाड, गणपतराव पाटील, आमदार नरेंद्र दरोड, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार अनिल आहेर, परवेझ कोकणी आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT