goods sold by the farmers are auctioned in the market committee. esakal
नाशिक

अबब! कोथिंबिरीला मिळाला हजारांत भाव; शेतकरी मालामाल

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक बाजार समिती दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात गुरुवारी (ता.२२) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला सोळा हजार रुपये भाव मिळाला.

कृषी उपन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दूगाव, धोंडेगाव,सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर तसेच पुण्यातील खेड, मंचर येथूनही पालेभाज्यांची आवक होत असते. गुरुवारी सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव झाले. (Coriander priced at Rs 16000 in Nashik Market Committee Nashik Latest Marathi News)

शिवांजली कंपनीत पालेभाज्या घेऊन आलेल्या दिंडोरी तालुक्यातील कोराटे गावातील शेतकरी सोमनाथ शिवाजी भंवर हे कोथिंबीर घेऊन आले होते. त्यांच्या कोथिंबिरीस सोळा हजार रुपये शेकडा बाजारभाव मिळाला. सदर कोथिंबीर संतोष भुजबळ या व्यापाऱ्याने घेतली असून मुलुंड, भांडूप व ठाणे येथील मार्केटला पाठविणार आहेत.

"नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या फळभाज्या व पालेभाज्या या शेतमालाला लिलावाद्वारे योग्य बाजारभाव मिळत असतो. शेतकरी बांधवांनी त्यांचा शेतमाल नाशिक बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा." - अरुण काळे सचिव, नाशिक बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 4th-5th ODI Team: श्रेयस अय्यरकडे वन डे संघाचे नेतृत्व; शुभमन गिल शेवटचे दोन सामने का नाही खेळणार?

Mumbai Fire: मुंबईत फटाक्यांच्या स्फोटामुळे दुकानाचा स्लॅब कोसळून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Nagpur Flights: नागपूर-मुंबई विमानभाडे पोहोचले २५ हजारांपर्यंत

IND vs NZ : तिसरा सामना तर पावसामुळे रद्द, आता 4th ODI सामना कुधी अन् कुठे पाहाणार? जाणून घ्या Live Streaming डिटेल्स

Latest Marathi News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी, ४-५ किमी रांगा

SCROLL FOR NEXT