Coriander crop news esakal
नाशिक

अबब! कोथिंबिरीला तब्बल 19 हजार रुपये भाव; शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात गुरुवारी (ता.२३) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला १९ हजार शंभर रुपये भाव मिळाला. (Coriander rate 19 thousand rupees at agricultural market committee nashik Latest Marathi News)

कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन,दूगाव, धोंडेगाव,सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर तसेच पुण्यातील खेड, मंचर येथूनही पालेभाज्यांची आवक होत असते. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव झाले .

साईधन कंपनीत पालेभाज्या घेऊन आलेल्या दिंडोरी तालुक्यातील नवळपाडा गावातील शेतकरी युवराज गावित हे कोथिंबीर घेऊन आले होते. त्यांच्या कोथिंबिरीस १९ हजार रुपये शेकडा बाजार भाव मिळाला. सदर कोथिंबीर मनोज परदेशी या व्यापाऱ्याने घेतली असून गुजरात सुरत येथील मार्केटला पाठविणार आहेत.

"माझे अवघे एक एकर क्षेत्र आहे. पावसाने बरेच नुकसान झाले आहेत. मिळालेला बाजारभाव यामुळे माझ्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते आहे."

- युवराज गावित, शेतकरी, नवळपाडा, दिंडोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

Kolhapur Ratnagiri Highway Truck Fire: कोल्हापूर -रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर वाघबीळ घाटात धान्याच्या ट्रकला आग; वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT