corona patient esakal
नाशिक

दिलासादायक बातमी! जिल्‍ह्‍यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत मोठी घट

अरूण मलानी

नाशिक : जिल्‍ह्‍यात गेल्‍या अनेक दिवसांनंतर ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण (active corona patient) संख्येत मोठी घट (decrease) झाली आहे. यामुळे जिल्‍ह्‍यात उपचार घेणाऱ्या रुग्‍णांची संख्या तीस हजारांच्‍या आत आली आहे. मंगळवारी (ता.11) दिवसभरात पाच हजार 385 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. तर दोन हजार 187 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. .38 बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत तीन हजार 236 ने घट झाली. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात 28 हजार 859 बाधितांवर उपचार सुरु आहेत. (corona activated decreased nashik marathi news)


जिल्‍ह्‍यात मंगळावारी झालेल्‍या कोरोनामुक्‍त रुग्‍णांमध्ये सर्वाधिक तीन हजार 443 कोरोनमुक्‍त नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 810 रुग्‍ण तर मालेगावचे 34, जिल्‍हा बाहेरील 98 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार 546, नाशिक ग्रामीणमधील 620, मालेगावचे सहा तर जिल्‍हा बाहेरील पंधरा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्‍यात सात हजार 475 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील पाच हजार 941 रुग्‍णांना प्रतिक्षा होती. नाशिक शहरातील एक हजार 194, मालेगावच्‍या 340 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार 989 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 721 रुग्‍ण असून, जिल्‍हा रुग्‍णालयात सहा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सतरा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये दोनशे, मालेगावच्‍या 45 रुग्‍णांचा समावेश आहे.


निफाडच्‍या आठ जणांसह जिल्‍ह्‍यात 38 बाधितांचा मृत्‍यू
मंगळवारी जिल्‍ह्‍यात 38 बाधितांचा मृत्‍यू झाला असून, यात नाशिक शहरातील सात, नाशिक ग्रामीणमधील तीस तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील एकाचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक आठ मृत निफाड तालुक्‍यातील आहेत. येवला तालुक्‍यात चार, बागलाण, इगतपुरी व मालेगाव तालुक्‍यात प्रत्‍येकी तीन बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. पेठ, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, सिन्नर तालुक्‍यात प्रत्‍येकी दोन तर नाशिक तालुक्‍यातील एका बाधिकाचा कोरोनाने बळी घेतला आहे.



दहा लाख व्‍यक्‍तींचा अहवाल निगेटिव्‍ह
जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना चाचण्यांचे प्रमाणही वाढविले गेले होते. आत्तापर्यंत झालेल्‍या 13 लाख 68 हजार 739 चाचण्या करण्यात आल्‍या आहेत. यापैकी दहा लाख एक हजार 158 रुग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत. तर तीन लाख 60 हजार 106 रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. शासकीय अहवालानुसार आत्तापर्यंतचा पॉझिटिव्‍हीटी दर 26.41 टक्‍के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT