Corona awareness through Bharud
Corona awareness through Bharud esakal
नाशिक

नाशिक : भारूडाच्या माध्यमातून कोरोना जनजागृती

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर येथील मातोश्री चंद्रभागाबाई व आयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयातर्फे भारूडाच्या माध्यमातून पथनाट्य सादर करत कोरोना (Corona) विषयक जनजागृती करण्यात येत आहे.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिन्नर बसस्थानक, गणपती मंदिर परिसर, गंगावेस परिसर या परिसरामध्ये भारूडाअंतर्गत कोरोनाविषाणूचा उगम, त्याची लक्षणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय, वाढत्या महामारीपासून नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी कशी घ्यावी याबाबत जागर करण्यात आला. परिसर स्वच्छता, प्रदूषण, वृक्षारोपण या विषयांवर जाणिवजागृती करण्यात आली. मुख्याध्यापिका रेखा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका चारूशिला देवरे लिखित व दिग्दर्शित भारूड पथनाट्य शाळेचे पर्यवेक्षक चंद्रभान कोटकर यांच्या नेतृत्वाखाली चांडक कन्याच्या विद्यार्थीनी श्रुती कदम, सायली लोणारे, श्रुती घोरपडे, गौरी येलमामे, सानिका कानकाटे, श्रावणी सोनार, वैभवी वैद्य यांनी भाग घेतला. पथनाट्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विवेक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पथनाट्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांनी पथनाट्याव्दारे मिळालेल्या सूचनांचे, संदेशाचे पालन, लसवंत होण्याचे आश्वासन दिले. एकुण भारुडांद्वारे गर्दी टाळा, काळजी घ्या आणि कोरोनापासून स्वत:चे व इतरांचे संरक्षण करा हाच संदेश विद्यार्थीनी देत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

Amey Wagh: "आता कुठल्याही पक्षात जावं आणि कोणाही बरोबर युती करावी..."; मतदानानंतर अमेय वाघची खरमरीत पोस्ट

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?

SCROLL FOR NEXT