manglagur.jpg 
नाशिक

यंदा माहेरवाशिणींची 'मंगळागौर' सासरीच...महिलांचा हिरमोड!

गायत्री जेऊघाले : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, जोडवी न्हाई मला, कशी मी नाचू...,’ अशा गीतांवर सुवासिनींना यंदा फेर धरून नाचता येणार नाही. श्रावणात प्रत्येक मंगळवारी मैत्रिणींसोबत महिला विविध खेळ खेळतात. यंदा कोरोनामुळे मंगळागौरीचे खेळ खेळता येणार नसल्याने बायकांचा हिरमोड झाला आहे.

यंदा सुवासिनींची मंगळागौरी सासरीच...

श्रावण महिन्याला मंगळवार (ता. २१) पासून सुरवात झाली. विविध व्रतवैकल्यांचा मानला जाणार श्रावण मंगळागौरीच्या खेळांमुळे महिलांना अधिक प्रिय आहे. यंदा श्रावणाच्या पहिल्याच दिवशी मंगळागौरीचे व्रत आले आहे. नवविवाहितांसोबत महिलाही एकाहून एक सरस गाणी गाऊन फुगड्या आणि विविध खेळ खेळतात. कोरोनाचे  सावट असल्यामुळे श्रावण महिन्यातील पहिल्याच मंगळवारी नवविवाहित महिलांनी सासरीच मंगळागौरी पूजन करून आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र काही महिलांची माहेरी येऊन मंगळागौरी साजरी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

एक महिन्‍याआधी आम्ही सगळ्या सख्या एकत्र येऊन खेळांचा सराव करतो. हे खेळ म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहेत. या वर्षी कोरोनामुळे आम्ही एकत्र येऊ शकत नाही, खेळू शकत नाही. - स्नेहल जोशी

मैत्रिणींबरोबर केलेला सराव, दर वर्षी नवीन सादरीकरण करण्याचा प्रयत्न, त्यासाठी घेतलेली मेहनत, प्रत्यक्ष कार्यक्रमाचे नियोजन या सगळ्यांची उत्सुकता असते. छान नटूनथटून येणाऱ्या मैत्रिणी आणि त्यांची फोटोची धडपड यांची आठवण येते. - प्राची कुलकर्णी, सचिव, संस्कार भारती, टिळक भाग

मंगळागौर म्हणजे आमची ऊर्जा आहे. कधी जून महिना उजाडतो आणि आमचा सराव सुरू होतो, याची प्रतीक्षा असते. प्रत्येक वर्षी खेळामध्ये नवीन काय करता येईल, यावर आवर्जून चर्चा होते. या वर्षी एकत्र येऊ शकत नाही, खेळ नाही याची खंत वाटते आहे. - पूर्वा सावज 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT