covid 19 
नाशिक

मालेगावमध्ये कोरोनाने पुन्हा काढले डोके वर! तीन दिवसांतच रुग्णसंख्या १३० वर

प्रमोद सावंत

नाशिक/ मालेगाव : शहरात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर व परिसरात कोरोना डोके वर काढणार असल्याची भीती खरी ठरत आहे. शुक्रवारी नव्याने ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांतच येथील रुग्णसंख्या १३० झाली आहे. पावणेदोनशेहून अधिक ॲक्टिव रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन व नऊ वर्षांच्या बालिकांसह २१ महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. नागपूर राज्य राखीव दलाच्या दोघा जवानांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पिंपळनेर, जायखेडा, झोडगे, अजंग-वडेल, वजीरखेडे, दाभाडी येथील रुग्ण वगळता उर्वरित सर्व रुग्ण शहरातील आहेत. नव्याने १९ रुग्ण दाखल झाले आहेत. पश्‍चिम भागातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत येथील सहारा कोविड सेंटरमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून, यातील तिघे कोरोनाबाधित, तर एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

बाणगाव येथील वृद्धाचा मृत्यू
बाणगाव बुद्रुक : नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या येथील ७५ वर्षीय वृद्धाचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत नाशिकलाच अंत्यसंस्कार झाले.

राशेगावला कंपनीत शिरकाव
दिंडोरी : राशेगाव येथील एका कंपनीत कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील आसाममधील एका कामगाराचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण म्हसरूळ येथे वास्तव्यास असून, आठ दिवसांपासून कामावर आलेला नाही. चार दिवसांपूर्वीच त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या पार्श्‍वभूमीवर कंपनीने स्थानिक कामगारांना सात दिवस सुटी दिली आहे.

ओझर परिसरात रुग्णसंख्या दोनशेवर
ओझर : ओझर, टाउनशिपसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २०८ वर पोचली आहे. यांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून, १४० रुग्ण बरे होऊन परतले आहेत, तर ६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नामपूरला वृद्धाचा मृत्यू
नामपूर : येथील शिवमनगर परिसरातील ६९ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याचा मालेगाव येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्यावर मालेगाव येथेच अंत्यसंस्कार झाले. दोन दिवसांपूर्वी येथील एका व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

रिपोर्ट - प्रमोद सावंत

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT