nashik esakal
नाशिक

निर्बंध शिथिल होताच नाशिककरांसाठी चिंता वाढविणारी बातमी!

अरूण मलाणी

नाशिक : कोरोना पॉझिटिव्हिटी रेट घटल्‍याने निर्बंध शिथिल झालेले असताना, नाशिककरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. दरम्‍यान, प्रशासकीय यंत्रणा सावध झाली असून, आवश्‍यक खबरदारी घेतली जात आहे. राज्‍यासह जिल्ह्यालाही कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेचा (corona second wave) फटका बसला होता. कोरोनाबाधितांच्‍या वाढत्‍या संख्येमुळे आरोग्‍य यंत्रणेवर ताण निर्माण झाला होता. आता दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात डेल्‍टा व्‍हेरिएंटचा (Delta variant of Covid-19) शिरकाव झाला आहे. या व्हेरियंटचे ३० रुग्ण आढळले असून, यापैकी २९ नाशिक ग्रामीणमधील आहेत. खबरदारीचा उपाय म्‍हणून आरोग्य विभागाचा चमू या रुग्णांवर उपचार करत आहे. त्‍यांच्‍या वैद्यकीय स्‍थितीवर लक्ष ठेवताना, संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींचा शोध घेतला जात आहे.

संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींचा शोध

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्‍या डेल्‍टा व्‍हेरिएंटचा (corona delta varient) नाशिक जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. प्रयोगशाळेत पाठविलेल्‍या १५५ नमुन्‍यांपैकी ३० नमुन्‍यांमध्ये डेल्‍टा व्‍हेरिएंट आढळला आहे. यात नाशिकच्या ग्रामीण भागातील २९, तर नाशिक महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा समावेश आहे. जगभरात आव्‍हान ठरत असलेल्या डेल्‍टा व्‍हेरिएंटपासून जिल्‍हावासीय अद्यापपर्यंत बचावलेले होते. परंतु, आता जिल्ह्यातील रुग्‍णांच्‍या नमुन्‍यात व्‍हेरिएंट आढळून आल्‍याने प्रशासकीय यंत्रणेचीही चिंता वाढली आहे. कोरोना पॉझिटिव्‍ह आढळलेल्‍या १५५ रुग्‍णांचे नमुने ‘एनआयव्‍ही’कडे उत्तरीय तपासणीसाठी पाठविले होते. त्‍यांचे अहवाल शुक्रवारी (ता. ६) प्राप्त झाले.

या तालुक्‍यांचा सहभाग

नाशिक ग्रामीणमध्ये सिन्नर, निफाड, नांदगाव, चांदवड या तालुक्यांतील कोरोनाबाधितांच्‍या नमुन्‍यात डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. लसीकरण न झालेल्‍या रुग्‍णांना या व्‍हेरिएंटपासून अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे.

एनआयव्‍हीकडे पाठविलेल्‍या १५५ नमुन्‍यांच्‍या तपासणीअंती ३० रुग्‍णांच्‍या नमुन्‍यात डेल्टा व्‍हेरिएंट आढळून आला आहे. हे रुग्‍ण वैद्यकीय निगराणीत असून, प्रशासकीय व आरोग्‍य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनीही कोरोनाविषयक उपाययोजनांचे काटेकोर पालन करत जबाबदारी पार पाडावी. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT