nashik waterfall.jpg
nashik waterfall.jpg 
नाशिक

पावसाळ्यात गर्दीने फुलणारे 'इथले' प्रसिद्ध धबधबे अन् पर्यटनस्थळे...यंदाचे वर्ष ठरणार अपवाद!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : पावसाळ्याच्या दोन अडीच महिण्याच्या कालावधीत जवळपास 70 ते 80 हजार पर्यटक येतात. त्यातून हजारो कुटूंबांना रोजगार मिळतो. रिसॉर्टपासुन छोट्या हॉटेलांपर्यतया व्यवसाय पर्यटकांच्या भरवशावर चालतात. अलीकडे तंबुत ( टेंड ) राहण्याची क्रेज निर्माण झाल्याने त्यातून व्यवसाय सुरु झाला आहे. मात्र सध्या यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरणार आहे.

पर्यटन व्यवसाय अडचणीत

इगतपुरी - त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. आतापर्यंत जंगल, शेती, मजुरी, मासेमारीपुरते नियोजन असलेल्या या भागातील कष्टकऱ्यांना अलीकडे पर्यटनातून थोडाफार उदरनिर्वाह मिळायचा. पावसाळी पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यातून रोजगार मिळतो. त्यामुळे वर्षा ऋतूत येथील पर्यटनस्थळ फुल असल्याने रोजंदारी मिळविण्यासाठी धावाधाव असायची. यंदाचे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरणार आहे. कारखाने वा इतर उद्योगधंदे नसलेल्या या भागात थोडीफार शेती आणि त्याला जोड असलेला पर्यटन व्यवसाय अडचणीत आहे.

धबधब्यांवर "नो एन्ट्री' 
भावली, दारणा,वाकी धरण गोल टेकडी, कसारा घाट परिसर, कावनाई, वाकी, कळसूबाई शिखर आदी निसर्गरम्य पर्यटनस्थळ.हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्यावर पर्यटकांना येण्याची परवानगी नाही. पावसाळ्याच्या दोन अडीच महिण्याच्या कालावधीत जवळपास 70 ते 80 हजार पर्यटक येतात. त्यातून हजारो कुटूंबांना रोजगार मिळतो. रिसॉर्टपासुन छोट्या हॉटेलांपर्यतया व्यवसाय पर्यटकांच्या भरवशावर चालतात. अलीकडे तंबुत ( टेंड ) राहण्याची क्रेज निर्माण झाल्याने त्यातून व्यवसाय सुरु झाला आहे. मात्र सध्या हा परिसर ' रेड ' झोन असल्याने पर्यटकांना प्रवेश नाही.

लॉकडाउनमुळे चक्का जाम..
निसर्गरम्य वातावरणाचा आंनद घेण्यासाठी हजारो पर्यटक रेल्वेने येतात. त्यांना पर्यटनस्थळी जाण्या-येण्यासाठी रिक्षा, काळी पिवळी व खाजगी वाहन चालकांची पर्वणीच असते. पण यंदा तीन महिण्यापासुन लॉकडाउनमुळे चक्का जाममुळे चालकांसमोर उपासमारीचे मोठे संकट आहे.


कोरोनामुळे इगतपुरीच्या पर्यटनस्थळी, धरण परिसरात पर्यटकांनी येऊ नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हॉटेल, रिसॉर्टमध्ये पर्यटकांना थांबुन देऊ नये.तसे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.- परमेश्वर कासोळे, तहसीलदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT