प्रवीण वाघ.jpg 
नाशिक

'बाबा जवळ का येऊ देत नाही?'...लेकीचा निरागस प्रश्न येताच आई होते स्तब्ध..

राजेंद्र बच्छाव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (इंदिरानगर) बाबा जवळ का येऊ देत नाही?...लेकीचा निरागस प्रश्न येताच आई होते निशब्द... स्वतःच्या दोन चिमुरड्यांना आणि कुटुंबाला तब्बल अडीच महिन्यांपासून त्यांनी दूर ठेवले आहे. लहान दोन लेकी बापाला बघून पळतच येतात...पण नाही त्यांना जवळ बोलावता येतंय अन् नाही लाड करता येतंय...ही बाब अत्यंत वेदनादायी असली तरी मात्र त्या कोरोना योद्धाला आपण करत असलेली सेवेचा सार्थ अभिमान आहे...

चिमुरड्यांना स्वतःपासून ठेवताय दूर

स्वतःच्या दोन चिमुरड्यांना आणि कुटुंबाला तब्बल अडीच महिन्यांपासून दूर ठेवत आतापर्यंत 350 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 700 जणांना ने-आण करणारे महापालिकेच्या रुग्णवाहिकेचे चालक प्रवीण वाघ कोरोनायोद्धा ठरले आहेत. वडाळागावात असलेल्या आरोग्य केंद्रावरील रुग्णवाहिकेवर सध्या चालक म्हणून ते काम करत आहेत. 27 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आल्यानंतर आजपर्यंत सातत्याने ते बाधित रुग्णांना ठरवून दिलेल्या रुग्णालयात पोचवत आहेत. दिवसभर पीपीई किट परिधान केल्याने सतत घामाच्या धारा वाहत असताना त्यांनी चोख कर्तव्य बजावले आहे. बुधवार पेठ येथील वाड्यांमध्ये आई, भाऊ, वहिणी, पत्नी प्रणाली आणि मुली स्वरा (6) आणि नभा (4) यांच्यासह ते राहतात. ते करत असलेली नोकरी बघता गेले अडीच महिने त्यांनी या दोन्ही चिमुरड्यांना स्वतःपासून दूर ठेवले आहे. लहान मुलीही वडील जवळ का येऊ देत नाही, असा प्रश्‍न आईला विचारत आहेत. 

स्वतःची स्वतंत्र व्यवस्था

ते रुग्णवाहिका आवश्‍यक जंतुनाशके वापरून सॅनिटाइझ करून घेतात. घरी त्यांनी स्वतःची स्वतंत्र व्यवस्था करून घेतली आहे. गेले अडीच महिने त्यांच्यासह कुटुंबातील कुणीही सदस्य शेजारी जाणे टाळत आहेत. नातेवाईक आणि मित्रपरिवारालाही घरी येऊ नये, अशी विनंती केली आहे. दवाखान्यात पोचवलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक बरे झाल्यानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी आवर्जून फोन करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन खासदार हेमंत गोडसे, विविध पोलिस अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला आहे. 

रोज मुली घरी गेल्यानंतर माझ्याकडे धाव घेतात. त्यांच्यापासून मात्र मी स्वतःला दूर करून घेतो. ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. हे राष्ट्रीय संकट असून, या काळात माझी सेवा मी देत आहे याचा अभिमान आहे. माझे काम जोखमीचे असले तरी करण्यासाठी एक आत्मिक शक्ती मला मिळते. - प्रवीण वाघ  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT