umrah.jpg 
नाशिक

यंदा भाविकांना 'हज' यात्रेस मुकावे लागणार...सौदी सरकारकडून यात्रा स्थगित!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (जुने नाशिक) मुस्लिम समाजात महत्त्व असलेल्या हज आणि उमराह यात्रेवर कोरोनाचे सावट आहे. हज यात्रेस तीन ते चार महिन्यांचा अवधी असल्याने निश्‍चित कुठलेही आदेश प्राप्त नाही. तर काही दिवसांत सुरू होणाऱ्या रमजान महिन्याच्या उमराह यात्रेस मात्र स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

भाविकांना यंदाच्या पर्वातील यात्रेस मुकावे लागणार

शुक्रवारी (ता. 24) चंद्रदर्शन झाल्यास शनिवार (ता. 25) पासून रमजान पर्वास (महिन्यास) सुरवात होणार आहे. 25 मेस रमजान ईद होणार आहे. पर्वाच्या दरम्यान शहरासह देशभरातील अनेक मुस्लिमबांधव उमराह यात्रा करत असतात. पर्वातील उपवास (रोजे) मक्का-मदिना येथे केल्यास अधिक पुण्य मिळते, अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळे हज यात्रेप्रमाणेच रमजान महिन्यातील उमराह यात्रेस मक्का-मदिना येथे जगभरातील मुस्लिम भाविक येत असतात. यंदा कोरोनाचे सावट असल्याने सौदी सरकारकडून यात्रा स्थगित केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच उमराह यात्रा स्थगित करण्यात आली होती. परंतु रमजान पर्वात तरी यात्रा होणार, अशी आशा मुस्लिम भाविक व्यक्त करत होते. कोरोनाचे सावट वाढल्याने यात्रा स्थगित करण्यात आली. इच्छा असणाऱ्या भाविकांना यंदाच्या पर्वातील यात्रेस मुकावे लागणार आहे. 

भाविकांमधील धाकधूक वाढली 

यंदाच्या हज यात्रेवर प्रश्‍नचिन्ह कायम आहे. हज यात्रेस तीन ते चार महिन्यांचा अवकाश असला तरी कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही. पुढील काही महिन्यांत त्याचा प्रादुर्भाव कमी होईल अशीही स्थिती नाही. त्यामुळे भाविकांमधील धाकधूक वाढली आहे. या महिन्यात सौदीमधील परिस्थिती सामान्य झाल्यास हज यात्रा सुरू होण्याची शक्‍यता आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT