subhash-bhamre.jpg 
नाशिक

निष्काळजीपणामुळे 'मालेगाव मध्य'मध्ये कोरोनाचा उद्रेक...खासदारांची टीका!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या निष्काळजीमुळे कोरोनाचा उद्रेक झाला. त्याचा फटका धुळे जिल्ह्याला बसला, असे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. तालुका चोहोबाजूने सील करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे.

यासाठी तालुका चोहोबाजूने सील करावा

"मालेगाव मध्य'मध्ये रेड झोन घोषित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यानंतर संचारबंदीची सक्ती करण्यात आली. शहरातील एक रुग्ण 3 मार्चला सौदी अरेबियातून येथे आला. त्याने प्रवासाची माहिती लपविली. तो आजारी पडला. त्याने खासगी डॉक्‍टरकडून उपचार घेतले. नंतर त्याचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. पॉझिटिव्ह रुग्ण हिमनगाचे टोक असू शकते, अशी भीती डॉ. भामरे यांनी व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्रात त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी तालुका चोहोबाजूने सील करण्याची त्यांनी मागणी केले. 

मालेगाव, सटाण्यासाठी निधी 

मालेगाव आणि सटाणा येथील आरोग्य यंत्रणा कोरोनाविरोधात सक्षम करण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी निधी दिला. मालेगावच्या हॉस्पिटलची स्वतः पाहणी केली. सात लाख रुपये दिले. आयोसोलेशन वॉर्डासह आवश्‍यक साधने पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा केला. व्हेंटिलेटरसाठी सहाय्य केले. बागलाण तालुक्‍यालाही सात लाखांचा निधी दिला. गरजू लोकांच्या अन्न-धान्याची व्यवस्था केली आहे. तसेच वेतनासह पीएम केअरसाठी दहा कोटींचा निधी दिला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अजरामर आहे'; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी महाराजांबद्दल काय सांगितलं?

IND vs SA 3rd T20I: १२,५,१२ धावा करणारा सूर्यकुमार यादव म्हणतो, मी आऊट ऑफ फॉर्म नाही, मी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करतोय...

Ajit Pawar: तिजोरी ओसंडून वाहत नाही! सरसकट गोवंश अनुदानावरून अजित पवारांचा टोला

Latest Marathi News Live Update : राजगुरुमध्ये क्लास सुरु असतानाच विद्यार्थाचा गळा चिरला

Chh. Sambhajinagar: मांजाने कापले नाक, डोळ्यांची नस; पडले तब्बल ४० टाके, बिडकीन येथे दुचाकीस्वार गंभीर

SCROLL FOR NEXT