virus-corona.jpg 
नाशिक

Coronaupdate : जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 78 वर; तर शहरातही कोरोनाचा फैलाव सुरूच

सकाळवृत्तसेवा

नाशिक/मालेगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून, प्रामुख्याने नाशिक शहरात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी (ता.4) दिवसभरात तब्बल 58 रुग्णांची भर पडली. दरम्यान, येवल्यातील सेंट्रिंग कामगाराचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मालेगावमध्येही आधी मृत्यू झालेल्या सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 78

येवल्यातील मोरे मळ्यातील 37 वर्षीय कामगार चार दिवसांपूर्वी येवला येथील रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यास बुधवारी (ता.3) जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी सकाळी नऊला त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 78 झाली आहे. दिवसभरातील पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये ओझरचा (निफाड) 23 वर्षीय तरुण आणि येवल्याच्या मोरे वस्तीवरील 36 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आहे. याशिवाय, जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि पारोळ्याचे एकेक व मुलुंडचे (मुंबई) दोघे कोरोनाबाधित आहेत. 

35 वर्षीय पोलिस कर्मचारी बाधित

नाशिक महापालिका हद्दीतील सर्वाधिक रुग्ण असून, नाशिक तालुक्‍यातील माडसांगवीचा एक, पेठ रोड येथील 42 वर्षीय रुग्ण, मालेगावला बंदोबस्तावरील 35 वर्षीय पोलिस कर्मचारी, हिरावाडीतील (पंचवटी) त्रिमूर्तीनगर येथील 46 वर्षीय महिला आणि पेठ रोडवरील नामको हॉस्पिटलजवळील 30 वर्षीय तरुण, विडी कामगारनगर येथील एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 25 व 53 वर्षीय महिला, शिवशक्ती चौकातील (सिडको) 35 वर्षीय, दत्तनगर (पंचवटी) येथील 55 वर्षीय, चक्रधर सोसायटी, टाकळी रोड येथील 63 वर्षीय वृद्ध व 29 वर्षीय रुग्ण आणि सागर कॅसल, पखाल रोड येथील 36 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. 

शहरात आणखी 30 रुग्ण कोरोनाबधित

दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या अहवालांनुसार शहरात आणखी 30 रुग्ण कोरोनाबधित आढळून आले आहेत. यामध्ये दिंडोरी रोडवरील स्नेहनगर मधील पाच, अंबड- लिंक रोडवरील 11 वर्षांची मुलगी, सिडकोच्या शिवशक्ती चौकातील तीन व आठ वर्षांच्या दोन मुलांसह सात रुग्णांचा समावेश आहे. तसेच मखमलाबाद रोडवरील 55 वर्षीय महिला, खोंडेनगरमधील 80 वर्षांच्या वृद्धासह आठ जण, सातपूर कॉलनीतील तरुण, हिरावाडीतील 44 वर्षीय रुग्ण, गंजमाळ येथील एक महिला व एक पुरुष, सिडकोच्या सावरकर चौकातील महिला व पुरुष, तर पखाल रोडचे महिला व पुरुष यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

आधी मृत्यू झालेले सहा पॉझिटिव्ह 

मालेगावमध्ये गेल्या महिन्यात मृत्यू झालेल्या 29 वर्षीय रुग्ण व 27 वर्षीय तरुणीसह आधी मृत्यू झालेल्या सहा संशयित रुग्णांचे अहवाल गुरुवारी (ता. 4) पॉझिटिव्ह आले. यात, जामनेर येथून पाहुणी आलेल्या व बुधवारी (ता. 3) रात्री मृत्यू झालेल्या महिलेचाही समावेश आहे. यामुळे कोरोनाबळींची संख्या 64 झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये तरुण, तरुणींचा समावेश असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी समर्थ कॉलनी भागातील एकाच कुटुंबातील सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यात प्रत्येकी चार पुरुष व महिलांचा समावेश आहे. तसेच, द्याने व संजरी चौक येथील दोन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. 

68 अहवाल प्रलंबित

मेमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश असून, कोरोनाबळींची संख्या 64 झाली आहे. मृत्यूनंतर पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यासह रुग्णांमध्ये श्रीरामनगर येथील 27 वर्षीय तरुणी, हजारखोली भागातील 29 वर्षाचा तरुण, महेवी नगरातील 60 वर्षीय महिला, इस्लामाबाद भागातील 54 वर्षांचा पुरुष, कुंभारवाडा भागातील 80 वर्षीय वृद्ध, तसेच बुधवारी फरानमध्ये मृत्यू झालेल्या जामनेर येथील महिलेचा समावेश आहे. गुरुवारी नव्याने 18 जण दाखल झाले असून, 11 जणांना पूर्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. 63 जण उपचार घेत असून, 68 अहवाल प्रलंबित आहेत.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT