corona e sakal
नाशिक

रमजान काळात मालेगावच्या पूर्व भागात रुग्णसंख्या, मृत्यूही कमी

मेच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये प्रामुख्याने पश्‍चिम भागातील व ग्रामीण भागातील रुग्णच आहेत.

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरासह तालुक्यात दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. यातही कोरोनाच्या पहिल्या लाटेत पूर्व भागात रमजान काळात व तत्पूर्वी कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे तांडव सुरू होते. दोन माजी महापौर व पाच प्रमुख मौलानांसह शेकडो जणांचे कोरोनाने बळी गेले. यामुळे गेल्या वर्षी रमजान ईदवर दु:खाचे सावट होते. या वेळी मात्र पूर्व भागात रुग्णसंख्या बोटावर मोजण्याइतकी असून, मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याने रमजान काळात मोठा दिलासा मिळाला. (Corona patients and mortality are also low in the eastern part of Malegaon city)

रमजानचे उपवास असूनही उपवास सोडल्यानंतर पौष्टिक खाणे, सुकामेवाचा वाढलेला वापर, बीफ व दूध विक्रीतील वाढ, कोरोनाची कमी झालेली भीती, पूर्व भागात सुरू असलेली रुग्णालये, डॉक्टरांचे अत्यल्प दरातील उपचार, ॲलोपॅथीबरोबरच होमिओपॅथी, युनानी व आयुर्वेदिक उपचार पद्धतीला मिळणारा वाढता प्रतिसाद, कोरोना चाचणी न करता आजाराला धाडसी पद्धतीने सामोरे जाण्याची पद्धती यांसह विविध कारणांमुळे पूर्व भागात रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण घटले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बडा कब्रस्तानात ४५९, तर आयेशानगर कब्रस्तानात १३३ दफनविधी पार पडले. या वेळी या प्रमाणात घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत मृत्युदर किंचित वाढला आहे.

मेच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये प्रामुख्याने पश्‍चिम भागातील व ग्रामीण भागातील रुग्णच आहेत. पूर्व भागातील रुग्ण बोटावर मोजण्याइतकेच आहेत. या आठवड्यात त्यांचेही प्रमाण कमी झाले आहे. एप्रिलच्या तुलनेत शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या घटली आहे. १ ते ७ मेदरम्यान शहरात ३६२, तर तालुक्यात ३१० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शहरातील साडेचारशे अहवाल प्रलंबित आहेत. तालुक्यातही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन, जनजागृती, लसीकरण, नजीकच्या आप्तेष्टांच्या मृत्यूनंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतलेली काळजी या सर्वांचा परिणाम जाणवू लागला आहे. आठवड्यात दोन दिवस वगळता शहरास तालुक्यात ५० पेक्षा कमी कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. तालुक्यात सध्या ३१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मेमधील कोरोनाबाधितांचा शहर व तालुक्यातील तपशील

तारीख - शहर - तालुका

१ मे - ३४ - ४३

२ मे - ४० - २९

३ मे- ८३ - ७४

४ मे - ३६ - ५३

५ मे - ८९ - ३९

६ मे - १८ - ३१

७ मे - ६८- ४१

---------------------

एकूण - ३६२ - ३१०

शहरातील कब्रस्तानातील एप्रिलमधील गत तीन वर्षांतील मृतांची तुलनात्मक आकडेवारी

सन - बडा कब्रस्तान - आयेशानगर कब्रस्तान

२०१९ - १४० - ४५

२०२० - ४५९ - १३३

२०२१ - २४८ - ८४

(Corona patients and mortality are also low in the eastern part of Malegaon city)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT