corona-virus 235.jpg 
नाशिक

BREAKING : मालेगावातील कोरोना पॉझिटिव्ह 22 वर्षीय तरुणीचा धुळ्यात मृत्यू.. कोरोनाचा दुसरा बळी सुद्धा मालेगावातूनच

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : धुळे येथे उपचार सुरू असलेल्या नयापूरा भागातील कोरोनाबाधित २२ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला आहे. मालेगाव (जि. नाशिक) येथील रहिवासी असलेल्या या तरुणीवर धुळ्यात उपचार सुरू होते. त्यावेळी तिची प्रकृती गंभीर होती. 

कोरोनाचा दुसरा बळी सुद्धा मालेगावातूनच 
सरकारी यंत्रणेने धुळे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री बारापासून रविवारी पहाटे पाचपर्यंत आरोग्य सेवा वगळता पूर्णतः संचारबंदी, "लॉकडाउन'चा आदेश बजावला आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळी साडेसहापर्यंत सरकारी यंत्रणा आणि हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयासह जिल्हा सर्वोपचार रुग्णालय दैनंदिन कामकाजात गुंतलेले असताना दोन "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळल्याची माहिती पुढे येताच वैद्यकीय व सरकारी यंत्रणा हादरली. साक्री येथील 53 वर्षीय कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला, तर मालेगाव येथील 22 वर्षीय तरुणीवर उपचार सुरू होते. त्यानंतर आता मालेगवाच्या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.

मालेगावात धोक्याची घटना

आठवडाभरापूर्वी एकही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती नसणाऱ्या नाशिक जिल्ह्यात आता संख्या १५ वर पोहचली असून इथेही धाकधूक वाढली आहे. यात ९ पॉझिटिव्ह व्यक्ती मालेगावमधल्या आहेत आणि एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. मालेगावात दोन दिवसात रुग्णांची संख्या वाढल्यानं आता मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं आहे. सलग दोन दिवशी इथे ९ कोरोना पॉझिटिव्ह लोक सापडल्याने सध्या खळबळ निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT