corona update esakal
नाशिक

जिल्ह्यात 17 पॉझिटिव्‍ह, 11 रुग्‍ण कोरोनामुक्‍त

अरुण मलानी

नाशिक : जिल्ह्या‍त दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनामुक्‍त रुग्‍णसंख्येतही समाधानकारक वाढ झालेली आहे. रविवारी जिल्ह्या‍त १७ रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर दुसरीकडे ११ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्‍णांची संख्या ८८ झाली आहे.

रविवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील १३, नाशिक ग्रामीण भागातील दोन, तर जिल्‍ह्याबाहेरील दोन रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले आहे. दिवसभरात मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने बाधित आढळून आला नाही. सध्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ८८ झाली असून, यांपैकी ६८ बाधित नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमधील दहा, मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोन, तर जिल्ह्याबाहेरील आठ रुग्‍णांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. या ८८ पॉझिटिव्‍हपैकी अवघ्या १६ बाधितांमध्ये लक्षणे आढळून आलेली आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत २० अहवाल प्रलंबित होते. हे सर्व प्रलंबित अहवाल नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्‍णांचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

समृद्धी महामार्ग ते दक्षिण मुंबई प्रवास सुपरफास्ट होणार! MSRDCच्या नव्या लिंक रोडमुळे प्रवासाचं चित्र बदलणार; कसा आहे मार्ग?

Asian U-15 Bronze: थायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत कऱ्हाडची अंजली वेताळ चमकली; १५ वर्षाखालील गटात भारताला कांस्यपदक

'दुपारी १.११ वाजता बॉम्बस्फोट'... विधानभवनाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

India Women Team Olympics 2028: भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं केलं; पुरुष संघाचं काय?

SCROLL FOR NEXT