corona virus.jpg 
नाशिक

ठेंगोडा येथे कोरोनाचा शिरकाव; मुंबईहून परतलेले दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह

सकाळवृत्तसेवा

नाशिक/सटाणा : ठेंगोडा (ता.बागलाण) येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून गावातील एक दाम्पत्य कोरोनाबाधित आढळून आले आहे. हे दाम्पत्य मुंबईहून ठेंगोडा गावात आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने ते स्वत: नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या स्वॅबचा अहवाल रविवार (ता.31) रोजी पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव यांनी दिली.

गावात भीतीचे वातावरण
 
तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सटाणा शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बागलाण तालुक्यात आता कोरोना बाधितांची संख्या 8 वर पोहोचली असून दोन रुग्ण यापूर्वीच बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या सटाणा 2, वरचे टेंभे 2 आणि ठेंगोडा 2 अशा सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज सकाळी जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात सटाणा 2 रुग्ण पॉझिटिव्ह असे दर्शविण्यात आल्याने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र हे दोन्ही रुग्ण ठेंगोडा गावातील असल्याचे काही वेळातच स्पष्ट झाले. मुंबई येथून हे दाम्पत्य (ता.17) रोजी ठेंगोडा गावात दाखल झाले होते. यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने ते स्वत: नाशिक येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. शुक्रवारी (ता.29) रोजी त्यांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

दरम्यान, मुंबई, पुणे, मालेगाव या मोठ्या शहरांमधून छुप्या पद्धतीने अनेक नागरिक सध्या नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा थैमान वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या दोन महिन्यांपासून व्यापारी बाजारपेठा बंद असल्याने हातावर पोट असलेल्यांसह मध्यमवर्गीय व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे आहे. बाहेरगावाहून शहर व तालुक्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांची माहिती तत्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करूनही विनापरवानगी तालुक्यात येणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ceasefire: इस्रायलकडून बेरूतवर मोठा हवाई हल्ला; ८० जणांचा मृत्यू, १०० लोक जखमी, इराणकडून होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर बंदी

Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT