corona  sakal media
नाशिक

नाशिक शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादूर्भाव

अरुण मलाणी


नाशिक :
जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव घटत चालला आहे. बुधवारी (ता. १०) जिल्‍ह्यात ४१ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. ४६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ५३१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील बाधितांची संख्या अधिक राहत होती. आता पुन्‍हा नाशिक शहरातील बाधितांची संख्या अधिक राहत आहे.

बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील २४, नाशिक ग्रामीणमधील १६ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. जिल्‍हाबाहेरील एका बाधिताला कोरोनाची लागण झाली आहे. एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, मृत व्‍यक्‍ती नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे. गेल्‍या काही दिवसांपर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या अधिक राहत होती. मात्र, गेल्‍या दोन-तीन दिवसांत समीकरण पुन्‍हा बदलले असून, कोरोना फैलावात नाशिक शहर पुन्‍हा केंद्रस्‍थानी ठरत आहे.

दरम्‍यान, सायंकाळी उशीरापर्यंत ७१० रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ५३२, नाशिक शहरातील ९१, मालेगावच्‍या ८७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २९६ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी २९१ रुग्‍ण नाशिक शहरातील होते. जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमधील तीन रुग्‍णांचा यात समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT