Corona Updates News  esakal
नाशिक

Corona Update : जिल्ह्यात अवघे 9 कोराना बाधित; प्रथमच सक्रिय रुग्‍ण संख्या एक आकडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशभरासह जिल्‍हावासीयांना गेल्‍या दोन वर्षांत कोरोनाच्‍या संकटाचा सामना करावा लागत होता. परंतु गेल्‍या काही महिन्‍यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असताना, शुक्रवार (ता.२) जिल्‍हावासीयांसाठी दिलासादायक ठरला आहे. कोरोना रुग्‍ण उद्भवण्यास सुरवात झाल्‍यापासून प्रथमच जिल्‍ह्‍यातील उपचार घेतलेल्‍या सक्रिय कोरोना बाधितांची संख्या एक आकडी झालेली आहे. सध्या जिल्ह्यात अवघ्या नऊ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (Corona Update Only 9 corona infected in district Active patient count single digit for first time Nashik news)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

शुक्रवारी जिल्ह्यात एका रुग्‍णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. तर दुसरीकडे पाच रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत चारने घट होऊन हा आकडा नऊवर आला आहे. सध्या सक्रिय असलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील सहा तर नाशिक ग्रामीण क्षेत्रातील तिघांचा समावेश आहे.

पावणे पाच लाख रुग्‍णांची कोरोनावर यशस्वीरीत्या मात

जिल्ह्यात आत्तापर्यंत चार लाख ८२ हजार ४२४ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. होती. यापैकी चार लाख ७३ हजार ५११ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. पूर्णपणे बरे झालेल्‍या रुग्‍णांची टक्‍केवारी ९८.१५ अशी आहे. दरम्‍यान जिल्ह्यातील आठ हजार ९०४ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक वाढ, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Asia Cup 2025 Super Four Scenario: बांगलादेशच्या विजयाने सुपर ४ ची स्पर्धा रोमांचक वळणावर; ३ जागांसाठी ५ संघांमध्ये चुरस... पाकिस्तानचा फैसला आजच

Share Market : भारतीय शेअर बाजाराची तेजीने सुरुवात; सेन्सेक्सने ओलांडला ८२६०० चा टप्पा, निफ्टीतही ७८ अंकांची वाढ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा पगार ऐकून थक्क व्हाल; पगाराशिवाय आणखी काय मिळतं त्यांना? जाणून घ्या सुविधा आणि एकूण संपत्ती

SCROLL FOR NEXT