कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक छायाचित्र प्रतिकात्मक छायाचित्र
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात ८० रुग्ण कोरोना बाधित

अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असला तरी ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या एक हजारावर स्‍थिरावलेली आहे. बुधवारी (ता.४) जिल्‍ह्‍यात ऐंशी रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. ९९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सध्या जिल्‍ह्यात एक हजार ०५२ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ३८, नाशिक ग्रामीण क्षेत्रात ३७, मालेगाव महापालिका क्षेत्रात एक तर जिल्‍हा बाहेरील चार रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. जिल्‍ह्‍यात एका बाधिताचा मृत्‍यू झाला असून, ही मृत व्‍यक्‍ती नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे. दीर्घ कालावधीनंतर नाशिक ग्रामीणमध्ये कोरोनामुळे मृत्‍यूसत्र सध्या तरी थांबले असून, ही दिलासादायक बाब आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार २२३ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ८०४, मालेगाव महापालिका क्षेत्रातील २६९, नाशिक महापालिका क्षेत्रातील दीडशे रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४२८ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३९८ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. तर नाशिक ग्रामीणचे २७, मालेगाव क्षेत्रातील एका रुग्‍णाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT