home-1-1.jpg 
नाशिक

काय सांगू भाऊ...घर कोणी देईना अन् घेताही येईना...कोरोनामुळं सगळीच पंचाईत!

दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (पंचवटी) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्याने जगण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यातच नव्याने घर भाड्याने देणे आणि घेणे या दोन्ही गोष्टी अवघड झाल्या आहेत. नोकरी गमावल्याने अनेकांनी राहते घर खाली करून गाव गाठल्यामुळे ती घरे बंद आहेत. तर नवीन भाडेकरूंचा स्वीकार करण्यास इमारतींमधील अन्य सदस्य राजी होत नसल्याने घर भाड्याने देणेही कठीण झाले आहे. 

घर भाड्याने मिळणेही अवघड

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र मंदीचे वातावरण असल्याने अनेक उद्योग-व्यवसाय बंद आहेत. कामधंदाच नसल्याने अनेकांना मासिक घरभाडे भरणेही शक्‍य नाही. त्यामुळे ज्यांची भाड्याची घरे होती, त्यांनी ती खाली करून देत गाव गाठले. शहरासह विविध उपनगरांतील सदनिका सध्या पडून आहेत. त्यामुळे केवळ भाड्याने घरे देऊन उपजीविका करणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे नवीन भाडेकरूंना घरात किंवा सोसायटीत प्रवेश करून देण्यास परिसरातील नागरिक विरोध करत असल्याने घर भाड्याने मिळणेही अवघड बनले आहे. एखाद्या सोसायटीतील फ्लॅट संबंधित मालकाने भाड्याने द्यायचा ठरविल्यास संबंधित सोसायटीतील पदाधिकाऱ्यांसह अन्य फ्लॅटधारकांकडून मोठा विरोध होत आहे. संबंधित व्यक्ती कोठूनही म्हणजे अगदी शेजारच्या इमारतीमधून आलेली असली तरी संबंधितांकडे फिटनेस सर्टिफिकेटची मागणी केली जात आहे. 

...आणि "त्यांना' पाठविले परत 

पंचवटीतील जुन्या आडगाव नाका भागातील चारमजली सोसायटीत शनिवारी (ता.6) एक व्यक्ती वास्तव्याला येताना सोबत मेडिकल सर्टिफिकेट घेऊन आली. भाडेकरारासह स्वच्छता करताना सोसायटीतील नागरिकांनी त्याचे व कुटुंबाचे स्वागतही केले. परंतु सोसायटीत सामानासह आल्यानंतर मात्र विरोधाला सुरवात झाली. मोठा वाद निर्माण होत असल्याने अखेर भाडेकरूने समजूतदारपणा घेत सामानासह परतीचा मार्ग स्वीकारला. 

शहरात असंख्य फ्लॅट रिकामे 

दोन फ्लॅट असलेल्या नागरिकांनी उत्पन्नाचा भाग म्हणून ते भाड्याने दिले. परप्रांतीय नागरिक शहरातून निघून गेल्याने ते फ्लॅट रिकामे पडले आहेत. साधारण 45 हजारांपर्यंत फ्लॅट भाड्याने दिले जातात. मोरवाडी, देवळालीगाव, पाथर्डी फाटा, अंबड, आगरटाकळी, सातपूर, जेल रोडचे बालाजीनगर या भागात खोल्या बांधून त्या भाडेतत्त्वावर देण्याचा नवा धंदा तयार झाला आहे. परंतु कोरोनामुळे परिस्थिती बदलल्याने त्या मिळकती रिकाम्या पडल्या असून, उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT