Corruption News  esakal
नाशिक

लाचखोरीच्या कारवाईने ‘आरोग्या’तील Corruption चव्हाट्यावर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील शासकीय आरोग्य यंत्रणेचे केंद्रबिंदू असलेल्या नाशिक आरोग्य उपसंचालक कार्यालयाचा प्रशासकीय अधिकारीच लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्याने येथे चालणाऱ्या छुप्या अर्थकारणाची सवंग चर्चा पाचही जिल्ह्यात होत आहे. जिल्हा रुग्णालयांशी सर्वसामान्य जनतेचा जसा थेट संपर्क येतो, तसा आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी येत नाही.

तसेच, या आरोग्य उपसंचालक कार्यालयात पाचही जिल्ह्यातील आस्थापनांसाठीचा खर्च, अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी निगडितबाबी, कंत्राटदार ठेकेदारांच्या ‘फाईलिंग’ अन्‌ कंत्राटी कर्मचाऱ्याच्या भरती या प्रक्रियांमध्ये मोठ्याप्रमाणात छुपे अर्थकारण होऊन आरोग्य यंत्रणाच भ्रष्टाचाराने पोखरली आहे. या निमित्ताने तरी या विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (Corruption in Health department due to Administrative Officer of Deputy Director of Health Office bribe case nashik news)

शालिमार चौकात असलेल्या सुपरस्पेशालिटी संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारातच नाशिक आरोग्य उपसंचालकांचे कार्यालय आहे. या उपसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

त्यामुळे या पाचही जिल्ह्यातील शासकीय आरोग्याशी संबंधित येणाऱ्या निधींसह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, अधिकारी-कर्मचाऱ्याच्या पदोन्नती, त्यांच्या बदल्या यासह विभागीय स्तरावरील आलेल्या तक्रारी आणि त्याच्या चौकशींचे अहवाल, कंत्राटी स्वरूपाची नोकर भरतीची प्रक्रियाही याच आरोग्य उपसंचालक कार्यालयातून होत असते.

या शिवाय, शासकीय आरोग्यासंदर्भातील योजनांसाठीचा निधी, त्यानुसार अंमलबजावणी, पाचही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या आस्थापनांवर करण्यात येणारा खर्च आदी स्वरुपासाठीचे कामकाजही याच आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत केले जाते.

याच उपसंचालक कार्यालयाचे गजानन लांजेवार हे प्रशासकीय अधिकारी होते. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवृत्तीनंतरच्या प्रलंबित कागदपत्रांच्या मंजुरीबाबत पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्याकडे लांजेवार याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

मात्र, संबंधिताने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने पथकाने लाचखोर लांजेवार यास रंगेहाथ अटक केली. या घटनेमुळे आरोग्य विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

संशयास्पद कारभार

आरोग्य विभागातील प्रशासकीय कामांसह आस्थापन, अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार-ठेकेदार यांचाच आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी नेहमीचा संपर्क असतो. सर्वसामान्यांचा आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी थेट संबंध येत नसल्याने येथे छुप्यारितीने चालणारे अर्थकारण उघड होत नाही. मात्र, लांजेवार प्रकरणामुळे येथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून, येथील अधिकारी-कर्मचारी हे छुप्या अर्थकारणात निर्ढावलेले असल्याची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT