Corruption esakal
नाशिक

नाशिक : ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार माहिती अधिकारात उघड

अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : पिंपळगाव नजिक (ता. निफाड) येथील ग्रामपंचायत हद्दीतील विनापरवानगी बोगस परवानगीद्वारे बेकायदेशीररित्या (illegal) उभारलेल्या बहुमजली इमारतीवर कारवाई होऊन अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात यावे तसेच ग्रामपंचायत (Gram Panchayat) रेकॉर्डवर खोट्या नोंदी करणाऱ्यांविरोधात तसेच सरपंच, ग्रामसेवक व प्रशासक यांच्या खोट्यासही शिक्क्यासह खोटी परवानगी दाखविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भास्कर घोडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Lina Bansod) यांच्याकडे केली आहे.

श्री. घोडे यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या कागदपत्रांसह सर्व पुरावे अर्जासोबत श्रीमती बनसोड यांच्याकडे सादर केले असून कारवाईची मागणी केली आहे. पिंपळगाव नजिक ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक १३०/३/१३०/४ मधील बिनशेती निवासी भूखंड क्र.२१,२२ व २३ यांचे ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक १०८९,१०९० व १०९१ यावर वसीम तांबोळी व नदीम तांबोळी यांनी अनिधिकृतपणे, बेकायदेशीररित्या कट करून तसेच शासनाची व ग्रामपंचायतीची दिशाभूल व फसवणूक करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बहुमजली इमारती बेकायदेशीररित्या व पूर्वपरवानगीनेच बांधल्या असे भासविण्यात आले आहे. मात्र माहिती अधिकार (RTI) उघड झालेल्या माहितीद्वारे नियमांची पायमल्ली करत बनावट दस्तावेज बनविल्याचे उघड झाले आहे.

विशेष म्हणजे विकासकाने खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद २०१६ मध्ये झाली असताना परवानगी मात्र १३ मे २०१५ ची दाखविली आहे. यासाठी ग्रामपंचायत परवानगी जोडण्यात आलेली आहे. यामध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचीसही आहे. माहिती अधिकारात याबाबत विचारणा केली असता सदर बांधकाम परवानगी वरील ग्रामविकास अधिकारी यांची सही पूर्णत्वाच्या दाखल्यावरील सह्या खोट्या असल्याबाबत ही खोटी असून ठराव मासिक बैठकीत करण्यात आला आहे.

"या चार मजली इमारतीचे बांधकाम करताना बोगस कागदपत्रे जमा करून माझी सही या बोगस कागदपत्रावर करून त्यात वापरलेले लेटरहेड व शिक्के मात्र कर्मचाऱ्यांच्या मदतीने मिळवून आल्याचे दिसून येते."

- शशिकांत कदम, ग्रामसेवक, पिंपळगाव नजिक

"बोगस सही, लेटरहेड आणि शिक्के यांचा वापर करून ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणात संबंधितांनी लक्ष घालून कडक कारवाई करावी. यात सहभागी व्यक्तींचा शोध लावून त्यांच्यावर पण कारवाई करावी."

- भास्कर घोडे, पिंपळगाव नजिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT