jamun.JPG 
नाशिक

गुणकारी जांभूळ खाण्यासाठी मोजावे लागताय दुप्पट पैसे...कारण...

सकाळवृत्तसेवा

नाशिक/नरकोळ :  आयुर्वेदिकदृष्ट्या रुग्णांना उपयुक्त असणारे जांभूळ बाजारात दाखल झाले आहे. यंदा कोरोनामुळे ग्रामीण भागातील विक्रेते पुढे येत नसल्याने आवक कमी होत आहे. त्यामुळे जांभळाचा दर 100 ते 120 रुपये प्रतिकिलो आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर दुप्पट आहेत.

भुकटी बनविल्यास मधुमेहींना उपयुक्त

बागलाण तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यातील आदिवासी बांधव दर वर्षी जांभूळ विक्रीसाठी शहरात येतात. यंदा कोरोनामुळे त्यावर परिणाम झाला. मधुमेही रुग्ण जांभूळ खरेदीला पसंती देतात. जांभळाच्या बिया कोरड्या करून नंतर त्यांची भुकटी बनविल्यास मधुमेहींना उपयुक्त ठरते. लांबट आकाराची जांभळे चवीला आंबट, गोड, रसरशीत असतात. प्राचीन काळापासून भारतात जांभळांचा आहाराबरोबर औषधात समावेश केला जातो. जांभळाचा मोसम कमी दिवसांचा असतो. हे झाड अत्यंत ठिसूळ असते. जांभळे काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. 

जांभळाचे उपयोग 

-मधुमेहींना फायदेशीर, रुक्तशुद्धी, पिष्टमय पदार्थाचा साखरेत रूपांतर करण्यास आळा. 
-पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर येणे या विकारावर जांभळाचे सरबत उपयोगी. 
-दात, हिरड्या मजबुतीसाठी जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या करतात. 
-जांभळाच्या पानात "ई' जीवनसत्त्व. 
-जांभळात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस व "क' जीवनसत्त्व  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT