HAL esakal
नाशिक

HAL Covid Helpline - ध्येयवेड्या माजी सरचिटणीसाची दूरदृष्टी

उत्तम गोसावी

एचएएल कारखान्यातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांमधील कोरोनाचे वाढते प्रमाण आणि तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी एचएएल कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस संजय कुटे यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे.

ओझर (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील ओझर स्थित एचएएल कारखान्यातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांमधील कोरोनाचे (Corona Virus) वाढते प्रमाण आणि तिस-या लाटेचा (Third wave) सामना करण्यासाठी एचएएल कामगार संघटनेचे (HAL worker union) माजी सरचिटणीस संजय कुटे यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे. कोविडबाधित एचएएल कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सेवेसाठी एचएएल कोविड हेल्पलाइन (HAL covid helpline) सुरू केली आहे. (HAL Covid helpline for HAL workers)

एका कॉलमध्ये कामगाराला मदत!

या हेल्पलाइनअंतर्गत एचएएलमधील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना कोविड काळात बेड (Bed) उपलब्धता, घरपोच औषध (Medicine) सुविधा, घरपोच मोफत भोजन, मोफत ऑक्सिजनपुरवठा (Oxygen), गृहविलगीकरण व्यवस्था (Home Isolation), रुग्णवाहिका/वाहन (Ambulance) तत्काळ उपलब्ध करणे, अंत्यविधी मदतकार्य तसेच कोविडमधील प्राणायाम व योगा मार्गदर्शन अशा एकूण आठ पथके बनविण्यात आले असून, जवळपास १०० हून अधिक स्वयंसेवक या पथकामार्फत संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांची निस्वार्थ सेवा करणार आहेत. या हेल्पलाइनची एक वेबसाइटची लिंक बनविण्यात आली असून, कोविडबाधित एचएएलमधील कामगारांनी त्यातील आवश्यक मदतकार्यासाठी पुढील क्रमांकांवर क्लिक केल्यास कॉल थेट संबंधित स्वयंसेवकास जोडला जाणार असल्याने गरजू रुग्णाला मदत उपलब्ध होणार आहे. निफाडचे आमदार दिलीप बनकर तसेच जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनीसुद्धा या आदर्शवत उपक्रमाचे कौतुक केले आहे.

''एचएएल कामगारांच्या मदतीत सुसूत्रता आणण्यासाठी काम करण्याची कल्पना सुचली व कोविड हेल्पलाइन सुरू केली. नियोजनबद्ध पद्धतीने कामाची वाटणी करून प्रत्येक गरजू कोरोनाबाधितांपर्यंत मदत पुरविण्याचे काम या पथकामार्फत आम्ही करणार आहोत. आमचीच सामाजिक संस्था असणा-या युवा फाउंडेशनतर्फे हेल्पलाइनमधून सेवा करणार आहोत.''
- संजय कुटे, माजी सरचिटणीस, एचएएल कामगार संघटना

(HAL Covid helpline for HAL workers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT