नाशिक : त्यावेळी रुग्णाला माहीत नसते, की आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत की निगेटिव्ह. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेतर्फे जोरदार जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यावरूनच महापालिकेच्या वैद्यकीय विभागाबाबत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ असा प्रत्यय येत आहे.
रुग्ण पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह एकाच रांगेत
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेतर्फे जोरदार जनजागृती मोहीम राबविली जात आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, साबण किंवा हँडवॉशने हात धुणे आदी सल्ले दिले जात आहेत. दोघांमध्ये किती अंतर असावे, लक्षणे आढळल्यानंतर काय उपाययोजना केल्या पाहिजे आदींबाबतही पालिकेकडून सल्ले दिले जातात. प्रत्यक्षात संस्था म्हणून नियम पाळले जात नाहीत. बिटको या सर्वांत मोठ्या कोविड सेंटरमध्ये नियमांची रुग्णालय प्रशासनाकडूनच पायमल्ली होत असल्याची बाब समोर आली आहे. बिटको कोविड सेंटरमध्ये रुग्ण गेल्यानंतर प्रथम ओपीडीमध्ये केसपेपर काढला जातो. त्या वेळी रुग्णाला माहीत नसते, की आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत की निगेटिव्ह. रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट डिपार्टमेंटमध्ये आधारकार्ड तपासूनच टेस्ट केली जाते. रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आल्यानंतर बाजूच्या रूममधून प्रमाणपत्र दिले जाते. परंतु त्या प्रमाणपत्रावर शिक्का मारण्यासाठी पुन्हा जेथे केसपेपर काढला गेला, तेथे पाठविले जाते. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्णांना एकाच रांगेत उभे केले जाते. रुग्ण पॉझिटिव्ह आढळळ्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग असणे अपेक्षित आहे. परंतु बाधित असलेले व नसलेले दोन्ही एकाच रांगेत उभे केले जात असल्याने कोरोनावाढीला रुग्णालयाकडून बळ मिळत असल्याचा आरोप होत आहे.
बिटकोचे डॉक्टर क्वारंटाइन?
बिटको कोविड सेंटरमध्ये नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर एकदा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पीपीई किट घालून त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसतात. ड्यूटी संपल्यानंतरच ते बाहेर पडतात. यादरम्यान कोणाशी भेटगाठ नाही की बोलणे नाही, असा आरोप रुग्णांकडून केला जात आहे. मुख्य डॉक्टरांचा मोबाईल कायम स्वीच ऑफ असतो. कोविड रुग्ण तपासण्याची जबाबदारी कनिष्ठ वर्गाकडे आल्याने तेदेखील कामात टाळाटाळ करतात. कोरोनाबाधित रुग्ण सर्रास सेंटरबाहेर फिरताना, गप्पा मारताना आढळून येतात. कोविड सेंटरमध्ये खासगी सुरक्षा व्यवस्था आहे. परंतु त्यांच्याकडून दमदाटी होत असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक करतात.
हेही वाचा > धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ
बिटको कोविड सेंटरमध्ये रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना तत्काळ ॲडमिट करणे गरजेचे असताना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्णांना एकाच रांगेत सोशल डिस्टन्स न ठेवता उभे केले जाते. डॉक्टरांकडे तक्रार केल्यानंतर तुम्ही रुग्णालयात येऊ नका, असा उपरोधिक सल्ला दिला जातो. -जगदीश पवार, नगरसेवक
रुग्णालयांमध्ये मात्र नियमांबाबत बोंबाबोंब
नाशिक रोडच्या बिटको कोविड सेंटरमध्ये रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट झाल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह, त्यांना एकाच रांगेत उभे राहून कागदपत्र जमा करावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाबाबत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ असा प्रत्यय येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी करू नये, मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, असे सल्ले महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणांकडून दिले जात असले, तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मात्र नियमांबाबत बोंबाबोंब दिसून येत आहे.
हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता
संपादन - ज्योती देवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.