Virat Kohli Hairstyle
Virat Kohli Hairstyle esakal
नाशिक

Nashik : तरुणांमध्ये विराट कटची क्रेझ

खंडू मोरे

खामखेडा (जि. नाशिक) : व्यक्तिमत्त्वाची छाप पाडताना आकर्षक हेअर स्टाइलची (Hairstyle) भूमिका महत्त्वाची असते. ज्येष्ठांपेक्षा लहान मुले आणि तरुण हेअरस्टाईलबाबत खूपच काळजी घेतात. सलूनमध्ये गेल्यानंतर तरुण नवीन ट्रेंडप्रमाणे (New Trend) हेअर कटची (Hair cut) मागणी करतात. या प्रत्येक हेअर कटचे दर (Rate) ठरलेले असतात. काही वर्षांत तरुणांमध्ये ‘स्किन फेड’ म्हणजेच विराट (Virat Kohli Hairstyle) हेअर स्टाईल कटची फॅशन वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये या कटिंगची क्रेज वाढली आहे. (craze for different hairstyles among young people Nashik News)

या कटसाठी सलूनमध्ये १०० ते १५० रुपये घेतले जातात. डोक्यावरील या कटच्या स्टाईलप्रमाणे दाढीचीही विशिष्ट स्टाईल तरुणांमध्ये रुजली आहे. लहान मुले तसेच मोठ्या प्रमाणावर तरुण सध्या आपली केशरचना अशा पद्धतीने ठेवत आहेत.

तीन-चार वर्षापासून तरुणांमध्ये विराट कटचा ट्रेंड वाढला आहे. यामध्ये दोन्ही बाजूने केस बारीक केले जातात. डोक्यावर व्यवस्थित भांग पडेल इतके केस ठेवले जातात. काही जण हे केस रंगवून त्यात आणखी फॅशन करतात. आदिवासी तरुण सध्या अशी केशरचना मोठ्या प्रमाणावर करताना आढळून येतात. वन साइड, आर्मी या पद्धतीने केशरचना करणारे तरुण देखील मोठ्या प्रमाणावर सध्या आहेत. केशरचनेसाठी देखील मोठ्या प्रमाणावर खर्च करणारे तरुण सध्या ग्रामीण भागात वाढले आहेत.

काहींना ‘पुष्पा’चे वेड

पुष्पा (Pushpa) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बहुतांश तरुणाईचा आता पुष्पा हेअर स्टाईल कट झाले आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचे जसे वाढलेले केस आणि वाढलेली दाढी होती तशीच फॅशन तरुणांना कडून केली जात आहे. यात काही जण तर सेम पुष्पासारखे दिसण्यसाठी कृत्रिम केस कुरळे करत आहेत.

कोणत्या कटसाठी सलूनमध्ये काय दर?

विराट टू साइट दर ः १०० ते १५०

वनसाइट ः ८० ते १००

आर्मी कट ः ८० ते १००

स्ट्रेट लूक ः १०० ते १२०

"सध्या विराट, अल्लू अर्जुन तसेच आर्मीची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. अशा पद्धतीने केसांची रचना करून घेण्यासाठी तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ असून वीस ते पंचवीस दिवसांत तरुण सलूनमध्ये येत असतो."

- सोपान भदाणे, सलून व्यावसायिक, खामखेडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT