Rangoli made from leaves and flowers
Rangoli made from leaves and flowers esakal
नाशिक

Nashik News: ‘निर्माल्या’तून सुबक रांगोळ्यांची निर्मिती! सिन्नरच्या भूषण देशमुखची अद्भुत कलाकारी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील एका कलाकाराने निर्माल्यापासून पर्यावरणपूरक व सुबक रांगोळी साकारण्याचा उपक्रम यशस्वी केला आहे.

भूषण प्रभाकर देशमुख, असे कलाकाराचे नाव आहे. भूषण रोज देवघरातील देवीच्या घटासमोर निर्माल्यातून सुबक आणि मनमोहक रांगोळी काढत आहे. (Creation of beautiful rangolis from Nirmalya Amazing performance by Bhushan Deshmukh of Sinnar Nashik News)

गणेश पेठेतील कालिकामाता मंदिरात भाविकांकडून देवीला हार घातले जातात. दुसऱ्या दिवशी भूषण देशमुख ते हार आपल्या घरी नेतात. भूषण त्याचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतात.

पाना-फुलांच्या निर्माल्यात आणखी काही पाने-फुले टाकून भूषण त्याची आकर्षक रांगोळी आपल्या देवघरात देवीच्या घटासमोर काढतात.

गेल्या ९ ते १० वर्षांपासून भूषण निर्माल्यापासून रांगोळ्या काढत आहेत. भूषण देशमुख यांनी देवी-देवतांच्या रांगोळ्या हुबेहूब साकारल्या आहेत. त्यात पंढरपूरचा श्री विठ्ठल, सप्तश्रृंगीमाता, महालक्ष्मी, रेणुकामाता, भगवान शंकराची पिंड यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा अतिशय अप्रतिम पद्धतीने साकारल्या आहेत.

सामाजिक, राजकीय, सिनेसृष्टीतील कलावंतांच्या उबेहूब आवाजाने भूषण याने अनेकांना भुरळ पाडली आहे. कॉलेज जीवनापासून भूषण कला जोपासत आहे.

"कालिकामाता मंदिरातील निर्माल्य घरी नेतो. त्यातून पर्यावरणपूरक रांगोळी साकारतो आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करतो. वेळात वेळ काढून केवळ कलात्मक दृष्टिकोनातून छंद जोपासत आहे. माझ्या विविध आवाजाने कोणी दुःखी व्यक्ती सुखी होत असेल, तर त्याच्यासारखे पुण्य कुठेच नाही, असे मी मानतो."

- भूषण देशमुख, रांगोळी कलाकार, सिन्नर,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT