Credai Event
Credai Event esakal
नाशिक

Credai Shelter 2022 : पहिल्याच दिवशी १५ हजार नागरिकांची प्रदर्शनाला भेट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्रदर्शन म्हणून गणल्या जाणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांच्या क्रेडाई संस्थेच्या वतीने आयोजित शेल्टर-२०२२ या प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १५ हजारांहून अधिक नागरिकांनी हजेरी लावत स्वप्नातील गृहशोध घेतला. ५०० हून अधिक प्रॉपर्टीजमधून ८० जणांनी जागेवर बुकिंग करून प्रतिसाद नोंदविला.

डोंगरे वसतिगृह मैदानावर २८ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. त्यानंतर आज दिवसभर प्रॉपर्टी प्रदर्शन बघण्यासाठी नाशिककरांची पावले वळल्याचे दिसून आले. शनिवार व रविवार हे दोन दिवस सुट्ट्या असल्याने नाशिककरांना गृहशोध घेण्याची पर्वणी प्राप्त होणार आहे. (Credai Shelter 2022 15 thousand citizens visit exhibition on first day Nashik News)

सुटीच्या निमित्ताने प्रदर्शनात सहभाग नोंदविलेल्या व्यावसायिक संस्थांकडून साइट व्हिजिटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत आहे, असा विश्वास क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी व्यक्त केला.

१०० हून अधिक बिल्डर यांचे ५०० हून अधिक प्रकल्प एकच छताखाली उपलब्ध असलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकूणच शहराचे अर्थचक्र फिरण्यास गती मिळेल, असा विश्वास प्रदर्शनाचे समन्वयक कृणाल पाटील यांनी व्यक्त केला. प्रदर्शनात हॅप्पी स्ट्रीटमधील स्थानिक कलाकारांचे सादरीकरणाने आलेल्या दर्शकांचे मनोरंजन केले.

यशस्वितेसाठी क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईचे घटनाप्रमुख जितूभाई ठक्कर, महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष किरण चव्हाण, सुरेश पाटील, नेमीचंद पोद्दार, उमेश वानखेडे, मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी, नितीन पाटील, मनोज खिंवसरा, अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकर्णी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके आदी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

ऑनलाइन पासची मुदत २८ पर्यंत

शेल्टर प्रदर्शनास भेट देण्यासाठी दर्शकांना ऑनलाइन नोंदणी केल्यास मोफत प्रवेश देण्याचे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जाहीर करण्यात आले आहे. यासाठी फक्त क्यूआर कोड स्कॅन करून आपली माहिती भरल्यास एन्ट्री पास त्या दर्शकाच्या मेलवर येईल. या आधी अशा ऑनलाइन नोंदणीची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत होती; पण त्याची मागणी बघता ही मुदत प्रदर्शन कालावधीपर्यंत म्हणजे २८ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

लकी ड्रॉचे मानकरी

१) राजा शेख

२) सुमीत चौधरी

३) प्रफुल्ल पाटील

४) प्रतीक देवरे

५) योगेश लोखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT