senior citizen with money.jpg
senior citizen with money.jpg 
नाशिक

"कुणी कर्ज घेता का कर्ज!"; पतसंस्थांवर आर्जवाची वेळ

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे उद्योग, व्यवसाय तीन-चार महिने ठप्प राहिले. अद्याप ते रुळावर आलेले नाहीत. त्याचा परिणाम व्यावसायिकांकडून बँका, पतसंस्थांकडे होणाऱ्या कर्ज मागणीवर झाला आहे. त्यामुळे ‘कुणी कर्ज घेता का कर्ज!’ असे आर्जव करण्याची वेळ पतसंस्थांवर आली आहे. लॉकडाउनपूर्वीच्या तुलनेत कर्ज मागणीत आता ५० टक्के घट झाल्याने बँका, पतसंस्थांच्या नफ्यावर परिमाण होण्याची शक्यता आहे. 

पतसंस्थांवर आर्जवाची वेळ; कर्ज मागणीत ५० टक्के घट 
अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर टप्प्याटप्प्याने काही व्यवसाय सुरू झाले. पण त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्राहकांचाही अद्याप तसा प्रतिसाद नसल्याचा अप्रत्यक्ष परिणाम आर्थिक संस्थांच्या कर्ज मागणीवर झाला आहे. बँका, पतसंस्थांचे बहुतांश कर्जदार छोटे-मोठे व्यावसायिकच आहेत. अगदी चहा विक्रेत्यापासून ते मोठ्या उद्योजकाला कर्जपुरवठा केला जातो. पण अनेक महिने व्यवसाय बंद राहिले. यामुळे काही जणांची जुनीच कर्जे थकीत आहेत, मग नवीन कर्ज घ्यायचे कसे, असाही प्रश्‍न आहे. कर्ज मागणी घटली असली, तरी लॉकडाउन काळात ठेवींमध्ये वाढ झाली आहे. या बदललेल्या प्रमाणाचा परिणाम आर्थिक संस्थांच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे. कर्जावर मिळणाऱ्या व्याजातून कर्मचारी वेतन, प्रशासकीय खर्च भागविला जातो. त्यातून शिल्लक राहणारी रक्कम नफ्याला जाते. पण कर्ज मागणी घटल्याचा परिणाम नफ्यावर होणार आहे. 

यंदा फक्त टिकून राहायचे 
पिंपळगाव शहरात बँका, पतसंस्थांचे मोठे जाळे विस्तारले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यानंतरचे लॉकडाउन आणि त्यातून अद्भवलेली आर्थिक परिस्थिती याच्याशी जुळवून घेण्याची भूमिका बहुतांश संस्थांनी घेतल्याचे दिसून येत आहे. यंदा नफ्याकडे पाहायचे नाही फक्त संस्था टिकवून ठेवायची, असा दृष्टिकोन संस्थाचालकांचा आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

व्याजदराचा टक्काही घसरला 
बँका व पतसंस्थांनी कर्जदारांना आकृष्ट करण्यासाठी व्याजदरात कपात केल्याने १२ टक्क्यांपर्यंत असणारा कर्जाचा व्याजदर ९ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. घटलेली कर्ज मागणी आणि वाढत्या ठेवींचा मेळ घालण्यासाठी ठेवीवरील व्याजदरही कमी केला आहे. कर्जावरील पूर्वीचा व्याजदर १२ ते १३ टक्के होता. सध्याचा तो ९ ते १२ टक्के आहे, तर ठेवींवरील पूर्वीचा व्याजदर १० ते ११ टक्के होता तो आता ८ त ९ टक्के झाला आहे. 

संपादन - ज्योती देवरे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT