An investor sitting in an office and Receipt of payment in the name of 'Shri Balaji Services'. 
नाशिक

Nashik Crime News: फायनान्शियल सर्व्हिसेस कार्यालयावर गुन्हे शाखेचा छापा

मोठ्या संख्येने गुंतवणूकदार येथे उपस्थित होते. मात्र उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : तेलंगणातील हैदराबादच्या ‘श्री बालाजी फायनान्शियल सर्व्हिसेस’ या नावाने सुमारे १२ हजार रुपये भरून सबसिडीसह त्या संस्थेमार्फत दोन लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवण्याची तक्रार प्राप्त झाल्याने वासननगर येथील एका फायनान्शिअल कन्सल्टन्सीच्या कार्यालयावर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. ३०) सायंकाळी छापा टाकला. (Crime Branch raid on Financial Services Office nashik crime news)

यातील कर्मचारी आणि प्रमुख महिलेची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मोठ्या संख्येने गुंतवणूकदार येथे उपस्थित होते. मात्र उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी आगाऊ रक्कम भरली असून, लाखोंच्या घरात हा फसवणुकीचा आकडा जाण्याची शक्यता तक्रारदारांनी व्यक्त केली.

फसवणूक झाल्याचा दावा करणाऱ्या राजूरबहुला येथील शोभा गायकवाड, निर्मला गायकवाड, सविता ससाणे आदी आणि पुरुषांनी वासननगरच्या संस्थेच्या प्रतिनिधींनी बालाजी ट्रस्टतर्फे गरजू आणि गरीब लोकांना हे कर्ज देण्यात येण्याची स्कीम आहे, अशी माहिती दिली आणि आमचे फॉर्म भरून घेतले. त्यात शहर भागातील लाभार्थींना ६० हजार, तर ग्रामीण भागातील लाभार्थींना ९० हजार रुपये सबसिडी आहे.

उरलेली रक्कम समान ३६ हप्त्यांत भरावी लागेल. यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अनेक ठिकाणच्या लाभार्थींना धनादेश देतानाचे छायाचित्रही पोस्ट करण्यात आले. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरवातीचे दोन हप्ते, नोटरी, प्रोसेसिंगचा खर्च आणि विम्याचा खर्च मिळून सुमारे १२ ते १३ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. एवढ्या कमी रकमेत सबसिडीसह कर्ज मिळेल, या आशाने ग्रामीण भागातील शेकडो हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी आणि महिलांनी पैसे भरले.

त्यासाठी ‘बालाजी सर्व्हिसेस’च्या नावाची पावती देण्यात आली. मात्र अपेक्षित दिवशी धनादेश न मिळाल्याने शिवाय ज्यांना मिळाले त्यांना पुढील तारखेचे मिळाल्याने मनात शंकेची पाल चुकचुकली. जमीनदार घेऊन या आणि धनादेश घेऊन जा, असे व्हाइस मेसेज आले. त्यामुळे धनादेश घेण्यासाठी आलो. दिवसभर येथे थांबलो. मात्र धनादेश मिळाला नाही. हळूहळू ही बाब सर्वत्र पोचल्याने या कार्यालयात गुंतवणूक करणाऱ्यांची गर्दी झाली.

मात्र संबंधित महिलेपर्यंत कुणालाही पोचू दिले जात नव्हते. अखेर याबाबत गुन्हे शाखेपर्यंत तक्रार पोचल्याने सायंकाळी गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अधिकाऱ्यांसह पाच जणांच्या पथकाने येथे छापा टाकला आणि चौकशीला सुरवात केली. रात्री उशिरापर्यंत पोलिस चौकशी करत होते. मात्र कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. येथे जमलेल्या गुंतवणूकदारांनाही पोलिसांनी तुमची सर्व माहिती घेतली असून, तुम्हाला कळविण्यात येईल, असे सांगत कार्यालयातून निघून जाण्यास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

Parli Vaijnath News : सलग दुसऱ्या वेळा राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभा मुंडेंने केली पाच सुवर्णपदकांची कमाई

Pune News : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी

Pune Crime : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Latest Marathi News Update LIVE : पंजाबमधील लुधियाना येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT